Sheetal Mhatre: प्रकाश सुर्वेंच्या मुलाला पोलीस अटक करू शकतात -सरदेसाई
Sheetal Mhatre and prakash surve video case update नागपूर : युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्या विधानाने शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे व्हिडीओ प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असतानाच वरूण सरदेसाई यांनी हे विधान केलं आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ मॉर्फ्ड आहे, […]
ADVERTISEMENT
Sheetal Mhatre and prakash surve video case update
ADVERTISEMENT
नागपूर : युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्या विधानाने शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे व्हिडीओ प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असतानाच वरूण सरदेसाई यांनी हे विधान केलं आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ मॉर्फ्ड आहे, तर मग खरा व्हिडीओ कुठे आहे? असा सवाल सरदेसाई यांनी केला.
वरूण सरदेसाई हे नागपूर दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलत असताना मुंबई Takने त्यांना शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी प्रश्न विचारला. ‘शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे विश्वासू साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी अटक केली, या प्रकरणावर काय भूमिका आहे’, असं देसाईंना विचारण्यात आलं. त्यावर देसाई म्हणाले, “राज्यात बरेच प्रश्न आहे आणि त्यामुळे एकाच विषयावर बोलत राहणे मला फार महत्त्वाचं वाटत नाही. तरी देखील विचारलं म्हणून मी सांगतो”, असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.
हे वाचलं का?
शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरण : पुण्यातील एका तरुणाला अटक
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर वरूण सरदेसाई काय म्हणाले?
व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर वरूण सरदेसाई म्हणाले, “या प्रकरणात दोन प्रश्न आहेत. पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर त्यांचं पहिलं कर्तव्य आहे, ते म्हणजे हा व्हिडीओ मॉर्फ्ड झाला आहे की नाही? हे शोधणं. कारण जर तो मॉर्फ्ड झाला असेल, तर खरा व्हिडीओ कुठे आहे. खरा व्हिडीओ समोर आला पाहिजे”, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ADVERTISEMENT
प्रकाश सुर्वेंच्या मुलानेच खरा व्हिडीओ लाईव्ह केला -वरूण सरदेसाई
“मला जी माहिती आहे, ती म्हणजे की हा जो खरा व्हिडीओ आहे, तो प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर जसाच्या तसा लाईव्ह केलेला आहे. त्यामुळे जर या प्रकरणात कुणाला अटक करायची असेल तर मुंबई पोलीस दल हे अतिशय सक्षम पोलीस दल आहे. मला पूर्ण खात्री आहे की, जो मुख्य आरोपी आहे, ज्याने हा व्हिडीओ बनवला तो म्हणजे प्रकाश सुर्वे यांचा चिरंजीव राज याला ते अटक करू शकतात”, असं म्हणत वरूण सरदेसाईंनी राज सुर्वे यांच्यावरच प्रकरण उलटवण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
Viral Video मुळे चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रे कोण आहेत?
…म्हणून भाजपला पराभव पत्करावा लागला; वरूण सरदेसाई काय म्हणाले?
“आमचं सरकार गेल्यानंतर अनेक निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत उभे राहिले आहेत, त्यांच्यावर दररोज आरोप होतात; दररोज त्यांच्यावर कारवाया होतात, फक्त राज्यातच नाही, तर देशभरात. विरोधकांवर ईडीच्या कारवाया होताहेत, हेच लोक जेव्हा भाजपात जातात, तेव्हा सगळ्या कारवाया बंद होतात. जनता पाहतेय आणि त्यांना हे रुचलेले नाही. त्यामुळे अलिकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आणि अनेक वर्षांपासून बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपला पराभव पत्करावा लागला”, असं वरूण सरदेसाई म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT