पुणे : ‘गडकरी साहेब, उडत्या बसेस बरोबर पाणबुड्याही घ्या; मनसेच्या वसंत मोरेंनी का केलीये मागणी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उडत्या बसेसची योजना फायदेशीर ठरेल, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. गडकरींच्या या विधानाची जोरदार चर्चा झाली. अनेकांनी शंकाही उपस्थित केलेत. याच विधानावर बोट ठेवत मनसेचे वसंत मोरेंनी बोट ठेवलं आणि गडकरींकडे थेट पाणबुड्या घेण्याचीच विनंती केली.

ADVERTISEMENT

पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा मुद्दा गेल्या आठवड्यात ऐरणीवर आला. नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. संतप्त नागरिकांनी त्यांची समस्या ऐकवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूल पाडण्याचे तसेच तातडीने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाय योजना करण्याचेआदेश दिले.

एकनाथ शिंदे यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौकात जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उडत्या बसेसच्या योजनेबद्दल माहिती दिली होती.

हे वाचलं का?

पुण्यात लवकरच हवेतून उडणारी बस, वाहतूक कोंडीवर नितीन गडकरींनी सांगितला उपाय

नितीन गडकरींनी पुण्यात केलेल्या उडत्या बसेसच्या योजनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. उडत्या बसेसची योजनेवरून अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट लिहिलीये.

ADVERTISEMENT

वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट, भाजप नगरसेवकांकडे बोट, गडकरींना केली पाणबुड्या घेण्याची विनंती

“मी आता कात्रज-कोंढवा रोडवर गाडी चालवत होतो, तेव्हा रोडवर इतके पाणी होते की, त्यामुळे मला गडकरी साहेबांची आठवण झाली. ते काल पुण्यात बोलत होते की, पुणे महानगरपालिकेनं उडत्या बस घेण्यासाठी प्रस्ताव द्यावा आम्ही विचार करू.”

ADVERTISEMENT

“साहेब आमच्या कोंढवा रोडवर एकूण ८ नगरसेवक आहेत. त्यातील ५ नगरसेवक भाजपचे आहेत. तेव्हा जर पुण्यात उडत्या बस घेणार असाल, तर प्लीज साहेब आमच्या कोंढवा रोडवर जरा दोन ते तीन पाणबुड्याही घ्या. कारण जोपर्यंत या रोडवर भाजपा आहे, तोपर्यंत हा रोड पूर्ण होणारच नाही. त्यासाठी पर्याय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना. यावेळी या कोंढवा रोडवर पूर्ण बहुमताने निवडून द्या १ वर्षात हा रस्ता पूर्ण करून दाखवतो”, असं दावा वसंत मोरेंनी केलाय.

‘त्या’ ऑफरवर नितीन गडकरी म्हणाले, ‘विहिरीत उडी मारून जीव देईन, पण काँग्रेसमध्ये येणार नाही’

नितीन गडकरी उडत्या बसेस योजनेबद्दल काय म्हणाले?

पुण्यात बोलताना नितीन गडकरी म्हणाले होते की, “आमच्याकडे हवेत उडणारी एक बस आहे. त्या बसमध्ये १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून वाहतूक झाली तर त्याचा फायदा होईल.

‘…तेव्हापासून नितीन गडकरी अस्वस्थच आहेत’; ‘ईडी’चा उल्लेख करत शिवसेनेनं काय सांगितलं?

पुढे बोलताना गडकरी म्हणाले होते, “ट्रॉली बसचा पर्यायही वापरता येऊ शकतो. ज्यात दोन बस एकमेकींना जोडल्या जातात आणि ती बस इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वा कोटी रूपये आहे. तेवढ्याच क्षमतेच्या ट्रॉली बसची किंमत ६० लाख रूपये आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे महापालिकेने अशी काही योजना तयार केली, तर आम्ही त्यासाठी निधी देऊ शकतो”, असं नितीन गडकरी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT