वेड ते क्रांती! ‘पठाण’च्या वादळात प्रादेशिक चित्रपटांनी गाजवलं बॉक्स ऑफिस
Pathan collection in India and regional language movies collection : बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ने सर्व रेकॉर्ड मोडले. इतर विक्रम लवकरच मोडीत निघतील असं सांगितलं जातं. दिल्ली, मुंबईपासून पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांपर्यंत ‘पठाण’ने चित्रपटगृहांमध्ये भरपूर व्यवसाय केला. शाहरुख खानच्या चाहत्यांचं प्रेमही यानिमित्तानं दिसून आलं. ‘पठाण‘ हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील आणि बॉलिवूड […]
ADVERTISEMENT

Pathan collection in India and regional language movies collection : बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ने सर्व रेकॉर्ड मोडले. इतर विक्रम लवकरच मोडीत निघतील असं सांगितलं जातं. दिल्ली, मुंबईपासून पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांपर्यंत ‘पठाण’ने चित्रपटगृहांमध्ये भरपूर व्यवसाय केला. शाहरुख खानच्या चाहत्यांचं प्रेमही यानिमित्तानं दिसून आलं. ‘पठाण‘ हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.
देशभरात भरघोस कमाई करणाऱ्या शाहरुखच्या चित्रपटापुढे प्रादेशिक चित्रपटांचा परिणाम होऊ नये, असे अनेकांना वाटत होते. ‘पठाण’च्या विविध राज्यातील कलेक्शन पाहिल्यास, रिपोर्ट सांगतात की केवळ हिंदी चित्रपटांच्या पारंपरिक बाजारपेठेतच नाही, तर दक्षिण आणि इतर ठिकाणच्या बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे.
दक्षिणेतील आंध्र (निजाम सर्किटपासून) ते म्हैसूर आणि तामिळनाडू-केरळ सर्किटपर्यंत, ‘पठाण’ने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि या सर्व बाजारपेठांमध्ये कमाईचे नवीन रेकॉर्ड तयार केले आहेत. अवघ्या 13 दिवसांत 29 कोटींची कमाई करून पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा चित्रपट ठरलेला ‘पठाण’ लवकरच 30 कोटींचा आकडा पार करणारा पहिला चित्रपट ठरणार आहे.
Pathaan : स्मृती इराणींनी ‘पठाण’ का पाहिला नाही? सांगितलं हे कारण