शिंदे सरकारने भरपूर प्रयत्न केले पण गुजरातचा निर्णय आधीच झाला होता : अनिल अग्रवाल
मुंबई : महाराष्ट्रातील तळेगावमध्ये प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन यांचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना रंगतो आहे. मागील 3 महिन्यांमध्ये काहीच प्रयत्न न झाल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असा आरोप शिंदे सरकारवर करण्यात येत आहे, तर यावर शिंदे सरकरामधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी […]
ADVERTISEMENT

मुंबई : महाराष्ट्रातील तळेगावमध्ये प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन यांचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना रंगतो आहे. मागील 3 महिन्यांमध्ये काहीच प्रयत्न न झाल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असा आरोप शिंदे सरकारवर करण्यात येत आहे, तर यावर शिंदे सरकरामधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. आता सगळ्या प्रकरणावर वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी ट्विट करत खुलासा केलाय.
परंतु याच आरोप-प्रत्यारोपात वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी शिंदे सरकारने जुलैमध्ये भरपूर प्रयत्न केले, मात्र गुजरातमध्ये हा प्रकल्प करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच झाला असल्याचं म्हटलं आहे. तसंच वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल अग्रवाल यांचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले अनिल अग्रवाल?
वेदांता-फॉक्सकॉन बहु-अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकरित्या जागेचे मूल्यमापन करत आहेत. ही अनेक वर्षांपासून सुरु असलेली वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे. आम्ही याची सुरुवात सुमारे २ वर्षांपूर्वी केली होती. आमच्या काही अंतर्गत आणि बहिर्गत व्यावसायिक एजन्सीजने आमच्या अपेक्षांची पूर्ती करणाऱ्या काही राज्यांची निवड केली.
यात गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यांचा समावेश होता. गेल्या २ वर्षांपासून आम्ही या प्रत्येक सरकारशी तसेच केंद्र सरकारशी चर्चा करत आहोत आणि आम्हाला त्यांचा चांगला पाठिंबा मिळाला.