ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचं निधन; हंसल मेहता यांची भावनिक पोस्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचं शुक्रवारी निधन झालं. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि युसूफ हुसैन यांचे जावई हंसल मेहता यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. हंसल मेहता यांनी एक भावूक पोस्ट लिहून त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

ADVERTISEMENT

युसूफ हुसैन यांचं शुक्रवारी निधन झालं. युसूफ हुसैन यांच्या निधनाची माहिती देताना हंसल मेहता यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी (युसूफ हुसैन) केलेल्या मदतीबद्दलच्या आठवणीला उजाळा देत श्रद्धांजली अपर्ण केली आहे. हंसल मेहता यांच्याबरोबरच मनोज वाजपेयीनेही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हंसल मेहता यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, ‘मी शाहिदचे दोन भाग पूर्ण केले होते आणि आम्ही थांबलो होतो. मी अडचणीमध्ये होतो. दिग्दर्शक म्हणून माझं करिअर संपण्याच्या मार्गावर होतं. त्याचवेळी ते (युसूफ हुसैन) आले आणि म्हणाले की, ‘माझ्याकडे फिक्स डिपॉझिट आहे.’ तू अडचणीत असशील तर ते माझ्या काही कामाचे नाही. त्यानंतर त्यांनी साईन करून एक चेक मला दिला. शाहिद चित्रपट पूर्ण झाला. असे होते युसूफ हुसैन! माझे सासरे नाही, तर माझे वडील. आयुष्याचं अस्तित्व असतं तर ते त्यांच्या रुपात असतं.’

हे वाचलं का?

‘आज ते गेले. स्वर्गातील सर्व मुलींना जगातील सर्वात सुंदर मुलगी आणि प्रत्येक पुरूषाला चिरतरुण असल्याचं सांगण्यासाठी ते निघून गेले. युसूफ साहेब मी या नव्या आयुष्यासाठी तुमचा खूप आभारी आहे. आज मी खरंच अनाथ झालो आहे. आता आयुष्य पहिल्यासारखं नाही राहणार. मला तुमची खूप आठवण येईल. माझी उर्दू खराबच राहणार आणि हा लव यू लव यू’, असं हंसल मेहता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

युसूफ हुसैन यांची मुलगी सफीना हुसैन यांच्याशी हंसल मेहता यांचा विवाह झालेला आहे. युसूफ हुसैन यांनी विवाह, धूम 2, दिल चाहता है, रोड टू संगम, क्रेझी कुक्कड फॅमिली, ब्लू ऑर्गन्स, खोया खोया चांद, रेड स्वस्तिक आणि एस्केप फ्रॉम तालिबान यासारख्या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. छोट्या पडद्यावरही त्यांनी काम केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT