विधान परिषद निवडणुकीत कुणाचा ‘कार्यक्रम’ होणार?, आकडे काय सांगतात?
राज्यात राज्यसभा निवडणुकीचा गुलाल खाली बसत नाही, तोच विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये. राज्यसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत आघाडी सावध झाल्याचं दिसतंय. दुसरीकडे भाजपकडूनही राज्यसभा निकालाची पुनरावृत्ती करण्याचा दावा केला जातोय. त्यामुळे कोण कुणाचा कार्यक्रम करणार याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चाललीये. विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. […]
ADVERTISEMENT

राज्यात राज्यसभा निवडणुकीचा गुलाल खाली बसत नाही, तोच विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये. राज्यसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत आघाडी सावध झाल्याचं दिसतंय. दुसरीकडे भाजपकडूनही राज्यसभा निकालाची पुनरावृत्ती करण्याचा दावा केला जातोय. त्यामुळे कोण कुणाचा कार्यक्रम करणार याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत चाललीये.
विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. त्यासाठी एकूण १२ अर्ज दाखल झाले होते. मात्र, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली. तरीही विधान परिषद निवडणुकीतील चुरस कायम आहे.
विधान परिषद निवडणुकीतील चित्र थोडं वेगळं आहे. राज्यसभेला शिवसेनेनं जास्तीचा उमेदवार दिला होता. तर यावेळी काँग्रेसनं भाई जगताप यांना उमेदवारी दिलीये.
तीन पक्ष, ११ उमेदवार