MLC election : कोल्हापुरात लढाईआधीच महाडिकांकडून तलावर म्यान, धुळ्यात पटेल बिनविरोध
राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीत चार जागांवरील निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. चारही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपत एकमत झाल्यानं बिनविरोध निवडणूक होत असल्याचंच दिसून येत असून, अकोला आणि नागपूर येथे मात्र फाईट बघायला मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन जागांवर कोण जिंकणार हा सस्पेन्स कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर निवडून […]
ADVERTISEMENT

राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीत चार जागांवरील निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. चारही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपत एकमत झाल्यानं बिनविरोध निवडणूक होत असल्याचंच दिसून येत असून, अकोला आणि नागपूर येथे मात्र फाईट बघायला मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन जागांवर कोण जिंकणार हा सस्पेन्स कायम आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यात काही ठिकाणी महाविकास आघाडी (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस) आणि भाजपमध्ये बिनविरोध निवडणूक करण्यात यश आल्याचं दिसत आहे.
विधानपरिषद निवडणूक: भाजपची सारी भिस्त आयारामांवर, तीन उमेदवार तर मूळचे काँग्रेसी!
मुंबईत दोन्हीही जागा बिनविरोध