विजय शिवतारेंचा गृहकलह चव्हाट्यावर, एकीसोबत लग्न करून संसार, दुसरीसोबत पवईला वास्तव्य; पत्नीचा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारेल यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर त्यांच्या मुलीने फेसबुक पोस्ट करून आपल्या भावांवर गंभीर आरोप केले आहेत. तर मुलीच्या आरोपाला तिच्या आईने आणि विजय शिवतारेंच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी एक फेसबुक व्हीडिओ पोस्ट करून उत्तर दिलं आहे. मुलगा विनय शिवतारेच्या फेसबुक वरून व्हीडिओ पोस्ट करून मंदाकिनी शिवतारे यांनी विजय शिवतारे हे कुटुंबापासून अलिप्त राहात असल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे मंदाकिनी शिवतारे यांनी?

मी मंदाकिनी विजय शिवतारे बोलत आहे. काही वेळापूर्वी माझी मुलगी डॉक्टर ममता शिवदीप लांडेने केलेली पोस्ट मी वाचली. सदर पोस्टमध्ये तिने माझा मुलगा विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. वास्तविक गेल्या २७ वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत होते. त्यातील पहिली पाच वर्ष उज्ज्वला बागवे नावाच्या महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत मिनाक्षी रमेश पटेल हिच्यासोबत पवई येथे राहत आहेत. यामध्ये संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करुन घेणे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे.

हे वाचलं का?

काय आहे ममता लांडे-शिवतारेंची पोस्ट ( विजय शिवतारेंची मुलगी)

आज 22 जूनच्या पहाटे 3 वाजता ब्रीच कँडी रूग्णालयाच्या आयसीयू विभागात बसून हे लिहिण्याची वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं. मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठं कारण आहे. बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारख जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिल. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरचं स्थान आहे. अशा माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अवस्थ आहे.

ADVERTISEMENT

मागील काही दिवसात फेसबुकवरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं व आजही वाटतं असंही ममता शिवतारेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहितच आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अशाच बदनामीच्या धमक्या देत आहे.

असाही आरोप ममता लांडे-शिवतारे यांनी केला आहे. तर ममता यांनी हे आरोप केल्यानंतर मंदाकिनी शिवतारे यांनी फेसबुक लाईव्ह करून हे आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर विजय शिवतारे हे आधी एका दुसऱ्या बाईसोबत रहात होते. आता गेल्या काही वर्षांपासून मीनाक्षी पटेल या बाईसोबत पवई या ठिकाणी राहतात असंही म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT