विनायक मेटेंचा अपघात कुठे आणि कसा झाला?, रायगड पोलीस काय म्हणाले?
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झालं. मराठा आरक्षणासंदर्भातील एका बैठकीसाठी मुंबईला येत असतानाच पहाटे ५.०५ वाजता विनायक मेटे यांची कार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुर्घटनाग्रस्त झाली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. विनायक मेटेंना अपघातानंतर लवकर मदत मिळाली नसल्याचा दावा त्यांच्या चालकाने केलाय. या अपघातासंदर्भातील पोलिसांचाही रिपोर्टही […]
ADVERTISEMENT
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झालं. मराठा आरक्षणासंदर्भातील एका बैठकीसाठी मुंबईला येत असतानाच पहाटे ५.०५ वाजता विनायक मेटे यांची कार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुर्घटनाग्रस्त झाली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. विनायक मेटेंना अपघातानंतर लवकर मदत मिळाली नसल्याचा दावा त्यांच्या चालकाने केलाय. या अपघातासंदर्भातील पोलिसांचाही रिपोर्टही आता समोर आलाय. (Shiv Sangram chief Vinayak Mete dies in car accident)
ADVERTISEMENT
अंबाजोगाईत कार्यकर्त्यांसोबतची बैठक आटोपून विनायक मेटे रात्री मुंबईच्या दिशेने Endeavour गाडीने (MH 01 DP 6364) रवाना झाले होते. चालक आणि एक सुरक्षा रक्षक असे तिघे या कारमध्ये होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील (Mumbai-Pune Expressway) दुसऱ्या लेनवरून मुंबईच्या दिशेनं येत असतानाच कार दुर्घटनाग्रस्त झाली.
विनायक मेटे यांचा अपघात कुठे आणि कसा घडला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (13 ऑगस्ट) पहाटे ५.०५ वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील माडप बोगद्याजवळ अपघात घडला. मुंबईच्या दिशेने दुसऱ्या लेनने जात असताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर पुढे असलेल्या अज्ञात वाहनावर गाडी जाऊन आदळली.
हे वाचलं का?
या अपघातात विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ आयआरबी रुग्णवाहिकेनं कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिथे डॉ.धर्मांग यांनी तपासणी करून विनायक मेटे यांना मयत घोषित केलं.
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचं अपघाती निधन; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारचा अपघात
ADVERTISEMENT
विनायक मेटे यांचे सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकले होते. त्यांना कारमधून बाहेर काढून आयआरबी रुग्णवाहिकेनं तात्काळ एमजीएम हॉस्पिटल दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
विनायक मेटेंना लवकर मदत मिळाली नाही; चालकांचा दावा
विनायक मेटे यांना अपघातानंतर तासभर मदत मिळू शकली नाही. मदतीसाठी प्रयत्न केले, मात्र कुणीही गाडी थांबवली नाही, असा आरोप मेटे यांच्या गाडीचे चालक कदम यांनी केलाय. याबद्दल रायगड पोलीस पोलीस म्हणाले, “या गोष्टींचा तपास करण्यात येईल. तपासातून ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या समोर येतील.”
‘आजची सकाळ धक्का देणारी’; विनायक मेटेंच्या निधानाने राजकीय वर्तुळ हळहळले
एका मोठ्या ट्रकला गाडीने पाठीमागून धडक दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. पण अपघात नेमका कसा घडला आणि अपघाताला कोण जबाबदार आहे, हे तपासून समोर येईल. अपघातानंतर ट्रक निघून गेला,” अशी माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT