मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितला अन्…; विनोद कांबळीला एक कॉल पडला 1 लाखाला
डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढत असताना दुसरीकडे ऑनलाईन गंडा घातल्याची गुन्हेगारी प्रकरणही वाढत आहे. याचा फटका आता भारताच माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीलाही बसला आहे. एका व्यक्तीने स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचं सांगत बँक डिटेल्स घेतले आणि खात्यात 1 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढून घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला सायबर फसवणुकी […]
ADVERTISEMENT
डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढत असताना दुसरीकडे ऑनलाईन गंडा घातल्याची गुन्हेगारी प्रकरणही वाढत आहे. याचा फटका आता भारताच माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीलाही बसला आहे. एका व्यक्तीने स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचं सांगत बँक डिटेल्स घेतले आणि खात्यात 1 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढून घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला सायबर फसवणुकी फटका बसला. विनोद कांबळीला अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्याने स्वतःची ओळख बँकेचा अधिकारी अशी करून दिली. त्यानंतर त्याने विनोद कांबळीकडे केवायसी अपडेट (अद्ययावतीकरण) करण्यासाठी बँक डिटेल्स मागितले. त्यानंतर हा सगळा फसवणुकीचा प्रकार घटला. 3 डिसेंबर रोजी गुन्हा नोंद झाल्यानंतर ही घटना आली.
स्वतःला बँकेचा अधिकारी सांगणाऱ्या समोरील व्यक्तीने विनोद कांबळीकडे बँक डिटेल्स मागितली. केवायसी अपडेट केली नाही, तर कार्ड बंद होईल, अशी भीती या व्यक्तीने विनोद कांबळीला घातली. त्यामुळे विनोद कांबळीने बँक डिटेल्स त्या व्यक्तीसोबत शेअर केले.
हे वाचलं का?
विनोद कांबळीने ‘एनी डेस्क’ अॅप्लिकेशन डाऊनलोड केलं आणि केवायसी अपडेटसाठीची माहिती भरली. या अॅपमुळे विनोद कांबळीच्या मोबाईलचा अॅक्सेस सायबर गुन्हगाराला मिळाला. त्यानंतर विनोद कांबळीने ओटीपीही त्या व्यक्तीला सांगितला. त्या व्यक्तीशी बोलत असतानाच विनोद कांबळीच्या खात्यातून काही व्यवहार झाले. समोरील व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करत विनोद कांबळीच्या खात्यातून 1 लाख 14 हजार रुपये काढून घेतले.
खात्यातून पैसे गेल्याचं कळल्यानंतर कॉल केलेला व्यक्ती बँकेचा अधिकारी नसल्याचं विनोद कांबळीच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने त्याचा सीए, बँक अधिकारी आणि पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विनोद कांबळीच्या खात्यातून ज्या बँक खात्यात पैसे जमा कऱण्यात आले, त्याची माहिती पोलिसांनी बँकेकडे मागितली आहे.
ADVERTISEMENT
‘आम्ही कॉल रिकॉर्ड आणि ज्या बँक खात्यात पैसे वळवण्यात आले, त्याची माहिती मिळवत आहोत. त्यामुळे आरोपीला पकडता येईल,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. अशा प्रकारची सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी मोबाईलवर आलेला ओटीपी आणि केवायसीची माहिती कोणत्याही प्रकारच्या कॉलवर शेअर करून नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT