Kalicharan: कालीचरण महाराजांचं अत्यंत वादग्रस्त भाषण, नवा Video व्हायरल
मिथिलेश गुप्ता, कल्याण: महात्मा गांधींना शिवीगाळ करत नथुराम गोडसेचा जयजयकार करणाऱ्या कालीचरण महाराज यांना अखेर छत्तीसगडच्या पोलिसांनी अटक केली आहे. पण आता यानंतर कालीचरण महाराजांचा आणखी एक व्हीडिओ आता समोर आला आहे. समाजात तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणं केल्यामुळे कालीचरण महाराज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. कल्याणमधील एका कार्यक्रमासाठी आलेल्या कालीचरण महाराज यांनी दिलेलं भाषण […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, कल्याण: महात्मा गांधींना शिवीगाळ करत नथुराम गोडसेचा जयजयकार करणाऱ्या कालीचरण महाराज यांना अखेर छत्तीसगडच्या पोलिसांनी अटक केली आहे. पण आता यानंतर कालीचरण महाराजांचा आणखी एक व्हीडिओ आता समोर आला आहे. समाजात तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणं केल्यामुळे कालीचरण महाराज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
ADVERTISEMENT
कल्याणमधील एका कार्यक्रमासाठी आलेल्या कालीचरण महाराज यांनी दिलेलं भाषण आता व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये त्यांनी महात्मा गांधी आणि पंडित नेहरुंबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
10 डिसेंबर रोजी कल्याणच्या सकेत कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात महात्मा गांधी व पंडित नेहरूंबद्दल अपशब्द तसेच दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे विधान केलं आहे. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून कालीचरण महाराज यांच्यावर कल्याणमध्येही गुन्हा दाखल होईल का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच कार्यक्रमात पोलिसांचे आदेश डावलून त्यासोबत आपत्ती व्यवस्थापन, साथ रोग कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून कोळसेवाडी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता.
हे वाचलं का?
कालीचरण यांचं कल्याणमधील वादग्रस्त भाषण
‘सगळेच्या सगळेच्या मुसलमान हे दहशतवादी नाहीत. पण सगळे दहशतवादी मुसलमान कसे काय? त्याच दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला 10-10 लाख लोकं कसे जमा होतात? दहशतवादाला धर्म नाही असं म्हणतात. दहशतवादाला धर्म नाही मजहब आहे. इस्लाम हा दहशतवादाचा मजहब आहे. जागोजागी पाकिस्तान बनले आहेत. जेवढे मुसलमान एरिया बनले आहेत ते सगळे पाकिस्तान आहे. आता तुम्ही म्हणाल की, याला काय प्रमाण आहे. मी सांगतो ना काय प्रमाण आहे.’
ADVERTISEMENT
‘भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये जर भारत हरला तर या सगळ्या मुसलमान परिसरात फटाके फुटतात हे प्रमाण आहे. मुसलमानांना पाहिलंय का कधी भारतमाता की जय म्हणताना? काही मुसलमान म्हणतही असतील. पण त्यांच्या दृष्टीने जे मुसलमान भारतमाता की जय म्हणणारे आहे ना ते बाकी सगळ्या मुसलमानांच्या नजरेत भटके हुये जवान आहेत.’
ADVERTISEMENT
‘भारतमाता म्हणजे काय? नकाशावर दिसणारा भूभाग म्हणजे भारतमाता ही कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. भारतमाताच का म्हणतो आपण? 100 करोड हिंदू लोकं जे हिंदुस्तानात राहतात ते भारतमाता आहेत. कारण की, 100 कोटी हिंदू लोकांचा समूह म्हणजे भारतमाता. ख्रिश्चन किंवा मुसलमान हे कधीच भारतमाता की जय म्हणणार नाहीत.’
‘कारण मुसलमानांची देशप्रती निष्ठा नसते, नव्हती.. आणि नसणार. त्यांची निष्ठा इस्लामच्या प्रती आहे. देशनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा ही कन्सेप्ट त्यांच्यात नसतेच. देशनिष्ठा बाळगणे हे इस्लाममध्ये हराम आहे. पाकिस्तान जेव्हा वेगळा झाला होता आणि युद्ध झालेलं तेव्हा मुस्लिम रेजिमेंट नावाची रेजिमेंट आपल्या सैन्यात होती. त्यांनी शस्त्र टाकून दिले. म्हणे आम्ही पाकिस्तानशी युद्ध करणार नाही. कारण की, ते इस्लामी राष्ट्र आहे आणि आमची निष्ठा इस्लामच्या प्रती आहे.’
Kalicharan Arrested: महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक
‘मग भारत काय आहे? शेंबड्यांनी सेक्युलर घोषित केला भारत. xxxxx नेहरु आणि xxxxx गांधी… पाकिस्तान आणि बांगलादेश मुसलमानांसाठी मुस्लिम देश म्हणून घेतला की नाही. इस्लामिक देश आहे म्हणून मुस्लिम रेजिमेंटने युद्ध करणार नाही शस्त्र टाकून दिले. पण नंतर भारताच्या सेनापतींनी मुस्लिम रेजिमेंटच बरखास्त करुन टाकली. तेव्हापासून भारतात मुस्लिम रेजिमेंट नाहीए.’ असं अत्यंत वादग्रस्त भाषण कालीचरण यांनी केलं होतं.
कालीचरण यांना रायपूरमधील वादग्रस्त भाषणाप्रकरणी आज (30 डिसेंबर) रायपूर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT