वर्धा : सात विद्यार्थ्यांनी जीव गमावलेल्या ‘त्या’ ठिकाणीच विचित्र अपघात; दोघे ठार, तीन गंभीर
–सुरेंद्र रामटेके, वर्धा वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या घटनेला काही दिवस होत नाही, तोच त्याच परिसरात आज पुन्हा एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर असून, एक किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेल्सुरा शिवारात विचित्र […]
ADVERTISEMENT
–सुरेंद्र रामटेके, वर्धा
ADVERTISEMENT
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या घटनेला काही दिवस होत नाही, तोच त्याच परिसरात आज पुन्हा एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर असून, एक किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेल्सुरा शिवारात विचित्र अपघात घडला आहे. जंगली रानडुक्कर आडवा गेल्याने इंडिका गाडी अपघातग्रस्त झाली. टू व्हीलरने जाणारे दोन व्यक्ती त्यांना मदत करण्यासाठी थांबले. एक व्यक्ती मदत करण्यासाठी गेला असता बालकांसह आई रोडच्या कडेला उभे होते, मात्र त्याच वेळेस भरधाव वेगाने येणार्या फॉर्च्युनर गाडीने अपघात ग्रस्त इंडिका कारला जोराची धडक दिली.
हे वाचलं का?
त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माय लेकांनाही उडवलं आणि टू व्हीलरने यवतमाळला जाणार्या दोन लोकांना चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी झाले आहेत, तर एक किरकोळ जखमी झाला आहे. मृतकांमध्ये चार वर्षीय बालकाचा समावेश आहे.
जखमी सहा लोकांना तात्काळ सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं. तिथे देवळी येथील म्हाडा कॉलोनी रहिवाशी चार वर्षीय रेयांश राकेश चाफलेला मृत घोषित करण्यात आलं, तर यवतमाळ जिल्ह्यतील दिघी गावचा रहिवाशी नरेंद्र भुराजी जुगनाके (वय २८) याचाही मृत्यू झाला आहे.
अन्य तीन गंभीर असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. गंभीर जखमींमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दाभा पहुर गावातील चंद्रशेखर वाट (वय ३०), देवळी येथील म्हाडा कॉलनी येथील रहिवाशी ललिता राकेश चाफले (वय ३६), पंजाबच्या बस्तर येथील रहिवासी गोल्डी सिंग (वय ३७) यांची प्रकृती फार नाजूक असल्याचं रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. नांदेड येथील रहिवासी जोग सिंग (वय ३२) किरकोळ जखमी आहे.
ADVERTISEMENT
फॉर्च्युनरमधील लोक फरार
ADVERTISEMENT
फॉर्च्युनर गाडीही अपघातग्रस्त झाली आणि पुलाच्या खाली जाऊन आदळली, मात्र वेळीच बलून उघडल्यामुळे कारमध्ये असलेल्यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र ते सर्व घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप अपघात झालेल्या ठिकाणाची स्वतः आले आणि अपघात कसा झाला याची माहिती जाणून घेतली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT