प्रेयसीच्या विरहात प्रियकराची आत्महत्या, मुलीच्या वडिलांनी तरुणाला पाठवलेलं तुरुंगात
सुरेन्द्र रामटेके, वर्धा: प्रेयसीच्या विरहातून प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील वायगाव येथे समोर आली आहे. मात्र, ही घटना फक्त यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. या घटनेमागे अनेक कारणं असल्याचं आता समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकी घटना काय आहे. वर्धा तालुक्यातील वायगाव येथील 21 वर्षीय सौरभ अनिल मस्के याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला लग्न करण्यासाठी पळून […]
ADVERTISEMENT
सुरेन्द्र रामटेके, वर्धा: प्रेयसीच्या विरहातून प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील वायगाव येथे समोर आली आहे. मात्र, ही घटना फक्त यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. या घटनेमागे अनेक कारणं असल्याचं आता समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकी घटना काय आहे.
ADVERTISEMENT
वर्धा तालुक्यातील वायगाव येथील 21 वर्षीय सौरभ अनिल मस्के याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला लग्न करण्यासाठी पळून नेले होते. यावेळी मुलीच्या वडिलांनी सौरभ विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्या तक्रारीत त्यांनी असं म्हटलं होतं की, माझ्या मुलीला लग्नाचे आमिष देऊन युवकाने फूस लावून पळवून नेलं आहे.
याच तक्रारीच्या आधारे अल्लीपूर पोलीस ठाण्यात सौरभच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी शोध घेऊन अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले. तर आरोपी सौरभ मस्के याच्यावर कलम 363 तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने जामीन फेटाळल्याने सौरभची कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
हे वाचलं का?
काही दिवसांनी जामिनावर सुटका झाल्यावर सौरभने आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गावातच एक पान टपरी भाड्याने घेतली होती. पण समाजातील लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही वेगळाच असल्याने त्याच्या मनात याविषयी बरीच चिंता होती. घडलेल्या प्रकारामुळे आपली समाजात खूप बदनामी झाली आहे. असा तो कायम विचार करत असल्याची माहिती त्याच्या कुटुबीयांनी दिली आहे.
सौरभने काल (29 डिसेंबर) सकाळी नेहमीप्रमाणे आपली पान टपरी उघडली. दिवसभर व्यवसाय केला परंतु त्याच्या मनात चिंता सतावत असल्याने त्याने त्याच ठिकाणी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी देवळी पोलिसांनी कलम 174 नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
ADVERTISEMENT
औरंगाबाद: ‘माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं’, पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा
ADVERTISEMENT
सौरभने अचानक असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रेयसीचा विरह सहन न झाल्यानेच त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याचं स्थनिकांचं म्हणणं आहे.
आजची युवा पिढी कुटुंबाचा व भविष्याचा कोणताही विचार न करता थेट आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. दिवसेंदिवस तरुणाई अधिकच भरकटत चालली असल्याचं यावेळी दिसून आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT