Mansukh Hiren प्रकरण ‘सरकार स्पॉन्सर्ड’ होतं का? फडणवीसांचा सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसुख हिरेन प्रकरणात आज त्यांच्या पत्नीने दिलेला जबाब मी विधानसभेत वाचून दाखवला. सचिन वाझे यांनी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय आहे असं त्यांच्या पत्नीने आपल्या जबाबात म्हटलं आहे. तरीही सचिन वाझेंवर कोणतीही कारवाई केली जात नाहीये त्यांचं निलंबन तर सोडाच त्यांच्यावर काहीही कारवाई न करता त्यांना पाठिशी घालतं आहे त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरण हे सरकार स्पॉन्सर्ड आहे का? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर टीका केली. या प्रकरणातलं सत्य बाहेर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

ADVERTISEMENT

Sachin Vaze नी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय-विमला हिरेन

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवलेली जी स्कॉर्पिओ आढळून आली ती स्कॉर्पिओ ही सचिन वाझे सुमारे चार महिने वापरत होते हा त्यांच्या पत्नीचा जबाब आहे. सचिन वाझे यांनी माझ्या पतीला तुम्ही दोन तीन दिवस अटक होऊन जा असंही सांगितल्याचं सांगितलं आहे. तसंच माझ्या पतीचा खून सचिन वाझे यांनी केला असा मला संशय आहे असंही मनसुख यांच्या पत्नीने जबाबात स्पष्ट केलं आहे. इतकं सगळं असूनही सचिन वाझेंना सोयीस्करपणे पाठिशी घातलं आहे. सचिन वाझेंना पकडण्यात आलं तर त्यांच्या चौकशीत कुणाची नावं समोर येतील? याची भीती सरकारला वाटते आहे त्यामुळे हे सरकार त्यामुळेच त्यांना पाठिशी घालतं आहे का? सचिन वाझे क्राईम इंटलिजिन्स युनिट मुंबईचे प्रमुख आहेत. या पदावर असल्याने त्यांना या प्रकरणातले पुरावे नष्ट करण्याची पूर्ण संधी आहे असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हे वाचलं का?

हो मी मिळवला सीडीआर, ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा: फडणवीस

आज गृहमंत्र्यांचं हसं झालं

ADVERTISEMENT

आज उत्तर देत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हसं झालं. आमच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सचिन वाझेंवर कारवाईचं आश्वासन दिलं होतं मात्र मुख्मयंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मात्र त्यांनी आपलं म्हणणं फिरवलं. गृहमंत्र्यांची परिस्थिती फारच वाईट झाली. त्यांना असं वाटलं की डेलकर यांचं नाव पुढे करून ते आम्हाला घाबरवू पाहात होते. मात्र मी डेलकर यांची सुसाईड नोट आणल्यामुळे त्यांना या मुद्द्याबद्दल काही बोलता आलं नाही. आज गृहमंत्र्यांनी आपलं हसं करून घेतलं आहे असंही फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT