ग्रामपंचायतीने शोधला जालीम उपाय! उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांवर cctv ची नजर

मुंबई तक

–जका खान, वाशिम रोगराईला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून हागणदारीमुक्त गाव उपक्रम राबवला जातो. मात्र, अजूनही अनेक गावातील चित्र बदललेलं नाही. अनेक ठिकाणी घरी शौचालय असतानाही लोक उघड्यावर शौचालयास जातात. वाशिम जिल्ह्यातील करंजीतही असंच चित्र आहे. उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांना ग्रामपंचायतीकडून सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नोटिसाही बजावल्या. 4 महिन्यांपासून हेच चालू आहे. मात्र, लोकांची सवय कायम असल्याचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

जका खान, वाशिम

रोगराईला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून हागणदारीमुक्त गाव उपक्रम राबवला जातो. मात्र, अजूनही अनेक गावातील चित्र बदललेलं नाही. अनेक ठिकाणी घरी शौचालय असतानाही लोक उघड्यावर शौचालयास जातात. वाशिम जिल्ह्यातील करंजीतही असंच चित्र आहे. उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांना ग्रामपंचायतीकडून सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नोटिसाही बजावल्या. 4 महिन्यांपासून हेच चालू आहे. मात्र, लोकांची सवय कायम असल्याचं वारंवार निर्दशनास आल्यानंतर सरपंचांनी उपाय शोधला. उपाय आहे सीसीटीव्हीचा!

वाशिम जिल्ह्याच्या करंजी ग्रामपंचायतने मागील 4 महिन्यापासून ग्रामस्थांना वारंवार सूचना दिल्या. नोटिसाही दिल्या तरीही ग्रामस्थांमध्ये सुधारण झाल्याचं ग्रामपंचायतील दिसून आलं. उघड्यावरच शौचालयाला जाण्याबरोबरच नागरिक घाणही आणून टाकत असून, दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात येत आहे. याला आळा घालण्यासाठी करंजी ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल पाटील लहाने यांनी अफलातून शक्कल लढवत चक्क सीसीटीव्ही कॅमेरेच बसविले.