महाविकास आघाडी फुटलेली नाही, आम्ही अजूनही सोबत-उद्धव ठाकरे

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कोरोनाचा मुकाबला केला. तर हे संकट त्यापुढे काहीच नाही असं म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय पेचावर भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी फुटलेली नाही. पुढे काय करायचं ते जेव्हा ठरवू तेव्हा आम्ही सांगणार आहोत. असं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

ADVERTISEMENT

जनता सगळं उघड्या डोळ्याने पाहते आहे

न्यायदेवतेच्या डोळ्यासमोर पट्टी असते. पण जनता उघड्या डोळ्यांनी सगळं पाहात असते. जोपर्यंत न्यायदेवता आहे त्यामुळे या देशात कायद्याचं राज्य असेल बेबंदशाही येऊ देणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. राजकीय पेच सुप्रीम कोर्टात गेला आहे त्याबाबत उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रं हाती घेतली आहेत. आता मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली. या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मात्र २१ जून २०२२ ला राज्यात बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला म्हणजे उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. त्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीही संपली अशा चर्चा सुरू झाल्या. अशात आज उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केलं.

महाविकास आघाडी मोडलेली नाही-उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी मोडलेली नाही, फुटलेली नाही. आम्ही आजही एकत्र आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आज सगळ्यांना भेटून बरं वाटलं. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही पुढचं सगळं ठरवू आणि ते ठरलं की तुम्हाला सांगू असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.एवढंच नाही तर जी बैठक झाली त्या बैठकीतही उद्धव ठाकरे म्हणाले की महाविकास आघाडी झाल्यापासून हे सांगण्यात आलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणीतरी दगा देईल. मात्र दुर्दैवी बाब ही आहे की माझ्याच लोकांनी मला दगा दिला. असंही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT