Maharashtra Lockdown : आम्हाला मदत करा नाहीतर आमचं अस्तित्वच संपेल – हॉटेल असोसिएशनची सरकारला विनंती
मुंबईसह महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने रविवारी राज्यात विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने Break The Chain या नवीन मोहीमेच्या माध्यमातून काही नवीन निर्बंध लागू केले आहेत. ज्यात हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद करण्यात आलं असून सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत आठपर्यंत पार्सल सेवा सुरु राहणार आहे. राज्यात कोरोनामुळे […]
ADVERTISEMENT
मुंबईसह महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने रविवारी राज्यात विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने Break The Chain या नवीन मोहीमेच्या माध्यमातून काही नवीन निर्बंध लागू केले आहेत. ज्यात हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद करण्यात आलं असून सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत आठपर्यंत पार्सल सेवा सुरु राहणार आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता हॉटेल व्यवसायिक सरकारला मदत करायला तयार आहेत. परंतू सरकारने आम्हालाही मदत करणं गरजेचं आहे, असं न झाल्यास आमचं अस्तित्व संपेल अशी भीती महाराष्ट्र हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
“या खडतर काळात हॉटेल व्यवसायिक सरकारच्या पाठीशी आहेत. मागच्या वर्षाप्रमाणे आम्ही यंदाही सरकारला मदत करुच. पण याचवेळी सरकारने आम्हाला मदत केली नाही तर आमचं अस्तित्वच संपेल. आमचा धंदा बंद करायचा आणि त्याबदल्यात कोणतीही मदत मिळणार नसेल तर आम्ही खरंच संकटात सापडू. सरकारने आमच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ काढायला हवा.” Hotel and Restaurant Association of Western India चे सिनीअर व्हाइस प्रेसिडंट प्रदीप शेट्टी यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना माहिती दिली. यावेळी बोलत असताना प्रदीप शेट्टी यांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या स्टाफची काळजी सरकारने घेणं गरजेचं आहे, नाहीतर या नवीन नियमांचा या व्यक्तींना सर्वात जास्त फटका बसू शकतो असंही सांगितलं.
हॉटेल बंद करा पण मालक आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय तरी द्या. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या स्टाफच्या पगाराची काळजी सरकारने घ्यावी. याचसोबत हॉटेल व्यवसायिकांना प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी चार्जेसमध्ये सवलत द्या, हॉटेल पूर्णपणे सुरु होईपर्यंत पाणी आणि विजेचं बील देऊ नका…असे उपाय सरकारने करणं गरजेचं आहे. सरकारला सध्याच्या परिस्थितीत हे कठोर निर्णय घेणं भाग आहे याची आम्हाला जाणीव आहे…परंतू हा खर्च आता आम्हाला झेपणारा नाही. आम्ही नेहमी सरकारसोबत उभे राहिलो आहोत आता सरकारने आम्हाला मदत करण्याची वेळ आली आहे.” शेट्टी यांनी मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांच्या समस्येबद्दल माहिती दिली.
हे वाचलं का?
याव्यतिरीक्त हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने नाइट कर्फ्यूबद्दलही आपल्या अडचणी बोलून दाखवल्या आहेत. हॉटेल व्यवसायिकांचा खरा धंदा हा रात्री ८ वाजल्यानंतर सुरु होतो. अशावेळी हॉटेल व्यवसायिकांना नाईट कर्फ्यूमधून सवलत मिळणं गरजेचं आहे अशी मागणी हॉटेल असोसिएशनने केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT