अदर पूनावालांची आणखी एका लसीबाबत घोषणा, जूनपर्यंत येणार नवी लस?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ यांनी आज एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सीरम इन्स्टिट्युट आणि नोव्हाव्हॅक्स यांच्या भागीदारीत होत असणाऱ्या लसीच्या चाचण्यांसाठी अर्ज केला आहे. कोव्होव्हॅक्स असं या लसीचं नाव असणार आहे ही लस जूनपर्यंत येऊ शकेल अशी आशाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे. याआधी कोव्हिशिल्ड ही लस सीरमने तयार केली. या लसीच्या चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या. तसंच ही लस अनेकांना लसीकरण मोहिमेदरम्यान देण्यातही आली. आता कोव्हाव्हॅक्स या नव्या लसीच्या चाचण्यांसाठी अदर पूनावाला यांनी अर्ज केला आहे. तसंच ही नवी लस जून 2021 पर्यंत येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा कहर होता. अशा वेळी कोरोनावर लस शोधण्याचं काम भारतीय कंपन्या करत आहेत. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्युट यांनी पुढाकार घेऊन कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या दोन लसी आणल्या सीरमने आणली ती कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकने आणली ती कोव्हॅक्सिन. या दोन्ही लसी भारतीयांना लसीकरण मोहिमेच्या वेळी देण्यात आल्या. आता सीरम इन्स्टिट्युने कोरोनाचा प्रतिबंध करणारी तिसरी लस आणायचं ठरवलं आहे.

नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकेतील लस तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीने सीरमसोबत करार केला आहे. नोव्हाव्हॅक्स आणि सीरम यांच्यात गेल्या वर्षी 30 जुलैला हा करार झाला आहे. नोव्हाव्हॅक्सच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यातली चाचणी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडली आहे. मात्र आता भारतात या लसीच्या चाचण्या करण्याची परवानगी सीरम इन्स्टिट्युटने मागितली आहे. या लसीचं वैशिष्ट्य हे आहे की लस कोरोना व्हायरस आण त्याच्या दोन म्युटेशनवरही प्रभावशाली ठरली आहे. जुन्या कोरोनावर 96 टक्के तर नव्या कोरोनावर 86 टक्के परिणाम दाखवणारी ही लस आहे. आता याच लसीच्या चाचण्या भारतात सुरु करण्यात याव्यात यासाठी अदर पूनावाला यांनी संमती मागितली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT