Rain Alert : पुणे, कोल्हापूरसह कोकणला अतिवृष्टीचा इशारा; IMD कडून ऑरेंज अलर्ट

मुंबई तक

मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यातील काही शहरात मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसा इशारा देण्यात आला असून, कोकणातील दोन जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, हे क्षेत्र तीव्र होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्याचबरोबर कमी दाबाचा पट्टा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यातील काही शहरात मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसा इशारा देण्यात आला असून, कोकणातील दोन जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, हे क्षेत्र तीव्र होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्याचबरोबर कमी दाबाचा पट्टा पश्चिम, दक्षिण पश्चिम दिशेला शक्यता वर्तवण्यात आली असून, याचा परिणाम राज्यात दिसून येणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पुढील ३ ते ४ दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (अतिवृष्टी सदृश्य) पाऊस होण्याची अंदाज आहे. तसा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

आज (१२ सप्टेंब) राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली असून, मुंबई, ठाण्यासह या सातही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp