तसं काहीही नाही म्हणणाऱ्या मिथुन चक्रवर्तींची थेट BJP मध्ये एंट्री
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीच अशी चर्चा सुरु झाली होती की, मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करतील. मात्र, त्यावेळी मिथुनदा यांनी म्हटलं होतं की, ‘…तसं काहीही नाही, तुम्ही काही अंदाज व्यक्त करु नका!’ पण त्यांच्या या वक्तव्याला […]
ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीच अशी चर्चा सुरु झाली होती की, मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करतील. मात्र, त्यावेळी मिथुनदा यांनी म्हटलं होतं की, ‘…तसं काहीही नाही, तुम्ही काही अंदाज व्यक्त करु नका!’ पण त्यांच्या या वक्तव्याला काही दिवसही झालेले नाहीत तोच त्यांनी थेट भाजपच्या मंचावर जात जाहीरमध्ये पक्षात प्रवेश केला.
ADVERTISEMENT
कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदानावर पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेदरम्यान, मिथुन चक्रवतींनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी पश्चिम बंगालचे भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी अशी माहिती दिली की, मिथुन चक्रवर्ती हे भाजपसाठी निवडणूक प्रचार करतील. (west bengal assembly election 2021 actor mithun chakraborty joins bjp)
मोहन भागवतांनी घेतली मिथुनदांची भेट, बंद खोलीत काय झाली चर्चा?
हे वाचलं का?
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपला बंगालामध्ये निवडणुकीसाठी एक चेहरा हवा होता. यासाठी भाजपचं केंद्रीय नेतृत्व बराच विचार करत होतं. याच दरम्यान, मोहन भागवत यांनी मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली होती. अखेर आज (7 मार्च) मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची एक चिंता मिटली आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसमध्ये असणारे मिथुन चक्रवर्ती हे भाजपमध्ये येणं हा खूप मोठा यू-टर्न मानला जातो.
बंगालमध्ये जन्म झालेल्या मिथुन चक्रवर्ती यांचा जीवन प्रवास जर आपण पाहिला तर त्यामध्ये डिस्को डान्सर ते सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय नेता असं सारं काही आहे. कारण मिथुन चक्रवर्ती हे राज्यसभा खासदार देखील होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तृणमूल काँग्रेसनेच त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. पण शारदा घोटाळा समोर आल्यानंतर दोन वर्ष खासदार पद भूषविलेल्या मिथुनदांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
ADVERTISEMENT
बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप आपलं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी स्थानिक चेहरा गेल्या अनेक दिवसांपासून शोधत होता.. अशावेळी मिथुनदा यांची आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी काही दिवसापूर्वी घेतलेली भेट अतिशय महत्त्वाची ठरली आहे. आतापर्यंत बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर सौरव गांगुली हा राजकारणात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. पण जेव्हापासून गांगुलीच्या हार्ट अटॅकची बातमी समोर आली तेव्हापासून त्याचं नाव काहीसं मागे पडलं होतं. अखेर बंगालच्या निवडणुकीसाठी आता मिथुन चक्रवर्ती यांनाच प्रोजेक्ट केलं जाणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT