सामान्य जनतेच्या मदतीचं काय? राज्यात नवे निर्बंध लागू झाल्यानंतर भाजपचा सरकारला सवाल
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रात विकेंड लॉकडाउनची घोषणा केली. याव्यतिरीक्तही उद्योगधंदे, व्यापारी यांच्यासाठी अनेक नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होम यासारखे अनेक नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. लॉकडाउन लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष […]
ADVERTISEMENT
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रात विकेंड लॉकडाउनची घोषणा केली. याव्यतिरीक्तही उद्योगधंदे, व्यापारी यांच्यासाठी अनेक नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होम यासारखे अनेक नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. लॉकडाउन लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करुन त्यांच्या सहकार्याची मागणी केली होती. परंतू लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामान्य जनतेला सरकार काय मदत करणार आहे असा सवाल विचारला आहे.
ADVERTISEMENT
“सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील सामान्य जनतेला खूप मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अनेक लोकं आजही रोजंदारीवर पैसे मिळवतात आणि त्यांच्या गरजा खूप महत्वाच्या असतात. दिवसभर काम करुन मिळणाऱ्या कमाईवर घर चालवणाऱ्या लोकांना या निर्णयाचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय मान्य करणं हे गरजेचं आहे. परंतू सरकारने देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील वीजकपातीबद्दलचा सल्ला ऐकायला हवा. फेरीवाले, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, रिक्षा चालक यासारख्या अनेक लोकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. यांना सरकारने आर्थिक मदत का जाहीर केली नाही?” चंद्रकांत पाटलांनी आपलं मत व्यक्त केलं.
राज्यातील जनतेचा जीव वाचवणं ही सरकारची सध्याची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतच सांगितलं. परंतू या निर्णयामुळे लोकांच्या रोजगारावर होणारा परिणाम व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्यास सरकार तयार नसल्याचंही पाटील म्हणाले.
हे वाचलं का?
दरम्यान, गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येने आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. कारण मागील 24 तासातील राज्यात तब्बल 57 हजार 074 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 222 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारची चिंता अधिकच वाढली आहे. या सगळ्यात गंभीर बाब म्हणजे आता राज्यात सध्या 4 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर सध्या प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT