पवार-फडणवीस भेटीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (31 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (sharad Pawar) यांची थेट त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या याच भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अशावेळी आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याच भेटीबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

जाणून घेऊयात चंद्रकांत पाटील हे शरद पवार-फडणवीस भेटीवर नेमकं काय म्हणाले:

‘शरद पवार हे मागील काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले होते. त्यामुळे ते पवार साहेबाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. या भेटीत काहीही राजकीय नव्हतं.’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्या भेटीमागे कोणतंही राजकारण नसल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

या ‘भेटी’मागे दडलंय काय…? शरद पवार-फडणवीस भेटीमागचे साडेतीन अर्थ!

दरम्यान, असं असलं तरीही ही भेट साधीसुधी नसल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी कधीही शरद पवार यांच्या थेट घरी जाऊन त्यांची भेट घेतली नव्हती. किंबहुना या दोन नेत्यांमध्ये सातत्याने वार-प्रतिवार पाहायला मिळाले होते. मात्र, असं असताना थेट शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याने फडणवीस यांच्या मनात नेमकं आहे तरी काय? याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

ADVERTISEMENT

पवार-फडणवीस भेटीचा नेमका अर्थ काय?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस हे सर्वसमावेशक राजकारण करता येईल का याची चाचपणी करत आहेत. खरं तर फडणवीस इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये म्हणाले होते की, ‘शरद पवार हे बुद्धीबळ खेळतात. याला पुढे कर, त्याला मागे कर… याची खाट टाक.. पण मी तसं राजकारण करत नाही.’ पण आता तेच फडणवीस एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यापुढे ठेऊन बुद्धीबळातील तिरक्या चालीप्रमाणे पवारांना भेटण्यासाठी तर गेले नव्हते ना? अशी चर्चा रंगू लागली आहे.

शरद पवार हे राजकारणातील मोठं नावं आहे. ज्येष्ठत्वाचा मान आज त्यांना दिला जात आहे. त्यामुळे फडणवीस यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करणं हा राजकीय शिष्टाचाराचा भाग असू शकतो. पण जेव्हा दोन बडे नेते अशा पद्धतीने अचानक भेटतात तेव्हा त्याला फक्त सदिच्छा भेट म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यामुळेच फडणवीसांवर सर्वसमावेशक राजकारण करण्याचा प्रयत्न दिसतो आहे.

देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दरम्यान, भाजपची सत्ता गेल्यापासून भाजपमधून फडणवीसांवर बरेच हल्ले होत आहेत. फडणवीस हे एककल्ली, मनमानी कामकाज करतात. असे त्यांच्यावर सातत्याने आरोप करतात. त्यामुळे आता मी सर्व हेवेदावे विसरुन पवारांना भेटायला जाऊ शकतो म्हणजे माझं मन किती मोठं आहे हे दाखविण्याचा देखील देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न असू शकतो. असा मेसेज त्यांनी पक्षाला आणि इतर नेत्यांनाही देण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT