Vaccination बाबत मोदी सरकारच्या कोणत्या चुकीच्या निर्णयांमुळे भासतोय लस तुटवडा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर माजवला आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग होतो आहे तसंच अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. कोरोनाची पहिली लाट दुसऱ्या लाटेपेक्षा काहीशी सौम्य होती असं म्हणायची वेळ आली आहे इतकी दुसरी लाट भीषण आहे. दुसऱ्या लाटेमध्ये लसीकरणावर भर देण्यात आला आहे. तरीही देशातल्या अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा भासतो आहे. मोदी सरकारने नेमक्या काय चुका केल्या आहेत. लसीकरणाच्या बाबतीत मोदी सरकारने नेमक्या काय चुका केल्या आहेत जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

जगातला सर्वात मोठा लसीकरण उत्सव असं आपण आपल्या लसीकरण मोहीमेचं वर्णन केलं. मात्र जानेवारी महिना ते मे महिना या कालावधीतलं लसीकरण पाहिलं तर लक्षात येतं की मागील काही दिवसांपासून लसीकरण मोहिम मंदावली आहे. याच गतीने जर लसीकरण होत राहिलं तर दोन, तीन कितीही वर्षे लसीकरणासाठी लागू शकतात.

18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबलं, याला जबाबदार कोण?

हे वाचलं का?

पहिली चूक

केंद्र सरकारने व्हॅक्सिन्सची ऑर्डर देताना विलंब लावला. कोट्यवधी लसी भारताबाहेर पाठवल्या. जानेवारी ते मे या कालावधीत भारताने ८० पेक्षा जास्त देशांना साडेसहा कोटींपेक्षा जास्त डोस पाठवले आहेत. त्यामुळे आपल्याकडे आता लस तुटवडा भासतो आहे.

ADVERTISEMENT

दुसरी चूक

ADVERTISEMENT

18 ते 44 या वयोगटाला लसी देण्याचा घेण्यात आलेला निर्णय घाईने घेतला होता, पूर्वतयारी शिवाय घेतला होता हे आता उघड आहे. याचं कारण 16 जानेवारीपासून सरकारने फ्रंटलाईन वर्कर्स, कोरोना योद्धे यांचं लसीकरण सुरू केलं. तर 1 एप्रिलपासून 45 वर्षे आणि त्यावरील लोकांचं लसीकरण सुरू केलं. फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षे यांच्या लसीकरण मोहिमेच्या टप्प्यात जसं अंतर होतं तसं अंतर 45 वर्षे आणि त्यावरील वयोगट व 18 ते 44 वर्षे या वयोगटात दिसून आलं नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा दुसरा डोस 45 वर्षे आणि त्यावरील वयोगटाला देऊन झाला नव्हता तरीही 18 ते 44 या वयोगटासाठीची लसीकरण मोहीम जाहीर करण्यात आली. त्यामुळे लस तुटवडा निर्माण झाला. महाराष्ट्राने तर आता 18 ते 44 या वयोगटाला लस देण्याच्या मोहिमेला तूर्तास स्थगितीही दिली आहे.

तिसरी चूक

भारतात हर्ड इम्युनिटी तयार करायची असेल तर 100 कोटी लोकांना लस मिळणं आवश्यक आहे. 100 कोटी जनतेला प्रत्येकी दोन डोस द्यायचे म्हणजे लसींचे 200 कोटी डोस लागणार. भारत सरकारने आत्तापर्यंत 45 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. अशात लसीकरण मोहिमेचे टप्पे वाढवले. पण लसी आहेत कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

18 ते 44 वयोगटाची नोंदणी तर झाली आहे मात्र संपूर्ण देशभरात या गटासाठी झालेलं लसीकरण हे अत्यल्प आहे. महाराष्ट्र सरकारने तर कोव्हॅक्सिन ही लस 18 ते 44 गटासाठी उपलब्ध नाहीच असंच स्पष्ट केलं आहे कारण या लसींचे डोस मिळेनासे झाले आहेत.

महाराष्ट्रात Lockdown वाढणार, 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण तूर्तास स्थगित-राजेश टोपे

भारतात किती लोकांचं लसीकरण झालं आणि काय आहेत त्याचे डिटेल्स?

भारतात आत्तापर्यंत 17.5 कोटी लोकांना लस दिली गेली आहे

यातले 13.5 कोटी लोक असे आहेत ज्यांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे

तर 3 कोटींपेक्षा जास्त लोक असे आहेत ज्यांना लसीचा दुसरा डोसही मिळाला आहे

16 जानेवारीपासून भारतात लसीकरण मोहीम सुरू झाली

पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर्स आणि कोरोना योद्धे यांचं लसीकरण

95 लाखांपेक्षा जास्त हेल्थ केअर वर्कर्सना लसीचा पहिला डोस मिळाला आहे

तर 64 लाखांपेक्षा जास्त हेल्थ केअर वर्कर्सना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे

1 मार्चपासून 45 वर्षे आणि त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या लोकांना लस मिळण्यास सुरूवात झाली

तर 1 एप्रिलपासून 45 वर्षे आणि त्यावरील सगळ्यांना लस देण्याची मोहीम सुरू झाली

45 वर्षे आणि त्यावरील साडेपाच कोटी लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे

तर याच गटातले 45 लाख लोक असे आहेत ज्यांना लसीचा दुसरा डोसही मिळाला आहे

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी समस्या हीच आहे की 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली. मागील दहा ते बारा दिवसांमध्ये 18 ते 44 या वयोगटातील देशभरात फक्त 20 लाखांपेक्षा जास्त लोकांना पहिला डोस मिळाला आहे.

मार्च महिन्यात देशभरात रोज 16 लाख लोकांचं लसीकरण होत होतं. एप्रिलच्या सुरूवातीला रोज 35 लाख लसी रोज दिल्या जात होत्या. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे प्रमाण 21 लाख लसींवर आलं. मे महिन्याच्या सुरूवातीला हे प्रमाण घसरून पुन्हा 16 लाख लसी रोज यावर आलं. त्यामुळे हे लक्षात येतं की आपला वेग हा आता मार्च महिन्यासोबत येऊन ठेपला आहे कारण आपण 18 ते 44 या वयोगटाला घाईने या मोहिमेत सहभागी करून घेतलं. 1 एप्रिल आणि 1 मे या दोन दिवसांची तुलना केली तर लक्षात येतं की 1 एप्रिलला देशभरात 36 लाख लोकांचं लसीकरण झालं होतं जे 1 मे रोजी 18 लाख लोकांचं झालं म्हणजेच एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात लसीकरण पन्नास टक्क्यांवर आलं. ज्या राज्यांमध्ये कोरोना जास्त आहे आणि अॅक्टिव्ह केसेस जास्त आहेत त्या राज्यांमध्येच लस तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतो आहे. मोदी सरकारने लसीकरणाच्या कक्षा वाढवल्या. पण त्यासाठी जी घाई केली त्याचा फटका आता देशाला बसतो आहे. त्यामुळेच देशात लस तुटवडा निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT