वाझेंना अटक करणारी NIA संस्था नेमकी आहे तरी काय, कशी झाली स्थापना?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. सचिन वाझेंची कसून चौकशी केल्यानंतर NIA ने त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वाझेंच्या अटकेनंतर NIA बाबत बरीच चर्चा सुरु झाली आहे.

ADVERTISEMENT

NIA ही संस्था नेमकी आहे तरी काय याविषयी आता अनेक जण जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे आता याचविषयी आम्ही आपल्या सविस्तरपणे माहिती देणार आहोत.

‘या’ घटनेनंतर NIA ची झाली स्थापना

हे वाचलं का?

26/11चा मुंबई हल्ला ही सगळ्याच भारतीयांची एक दुखरी बाजू. हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा भारतीय गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश मानलं गेलं आणि केंद्रीय पातळीवर दहशतवाद संबंधी प्रकरणांची चौकशी करणारी एक स्वायत्त संस्था असावी या उद्देशाने राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ची स्थापना करण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी NIA ची स्थापना केली होती.

NIA चे स्वरुप काय?

ADVERTISEMENT

NIA चे मुख्य काम हे देशभरात घडलेल्या दहशतवादी घटनांची चौकशी करणे आहे. कोणत्याही राज्यात देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला किंवा सार्वभौमत्वाला धक्का लागेल अशी घटना घडली तर त्या प्रकरणाची चौकशी ही NIA कडे सोपवली जाते.

ADVERTISEMENT

NIA चे देशभरात 8 ठिकाणी कार्यालये असून हेडक्वार्टर हे दिल्लीला आहे. देशाचे गृहमंत्री हे NIAचे प्रमुख असतात आणि त्यामुळे सध्या या संस्थेचे प्रमुख हे अमित शाह आहेत.

‘हे सर्व ठरवून घडवलंय’, वाझेंच्या अटकेनंतर सेनेचा BJPवर गंभीर आरोप

NIA ला तपासासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज नसते

देशातल्या कोणत्याही राज्यात दहशतवादी घटना घडली तर त्याच्या तपासाची जबाबदारी NIA कडे असते. त्यासाठी त्यांना संबंधित राज्यांच्या परवानगीची गरज नसते. तसेच ज्या आरोपींनी अटक किंवा ताब्यात घेतले जाते त्यांच्यावर NIAच्या विशेष कोर्टात केस चालवली जाते. अमेरिकेत ज्याप्रमाणे FBI चे काम चालते त्याच धर्तीवर भारतात NIA चे काम चालते.

‘Sachin Vaze यांना झालेली अटक बेकायदेशीर’, वकीलांचा युक्तीवाद

NIA कायदा 2019

1. आता NIA भारताबाहेर भारतीयांसंबंधी घडलेल्या गुन्हांची किंवा अपघातांची चौकशी करु शकणार आहे. याआधी NIA ला फक्त भारतात घडलेल्या गुन्हांची चौकशी कऱण्याचे अधिकार होते.

2. NIA च्या कक्षेत येणाऱ्या गुन्हांची व्य़ाप्ती वाढवण्यात आली आहे. पूर्वी फक्त दहशतवादी कृत्यांचा तपास करणारी NIA आता इतरही प्रकरणात तपास करु शकतं. जाणून घ्या कोणकोणत्या प्रकरणी एनआयए तपास करु शकतं.

1. मानवी तस्करी

2. बनावट चलन

3. प्रतिबंधित शस्त्रांचे उत्पादन किंवा विक्री

4. सायबर- दहशतवाद

5. स्फोटक पदार्थ कायदा 1908 अन्वये गुन्हे.

3. NIA साठी स्पेशल फास्ट ट्रक कोर्टाची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी फक्त केंद्र सरकार या कोर्टाची नेमणूक करु शकत होतं पण नव्या तरतुदीनुसार आता राज्य आणि केंद्र सरकार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मदतीने सत्र न्यायालयाची तरतूद ही NIA साठी करु शकतात. यामुळे NIA चे खटले हे फार काळ रेंगाळत नाही आणि त्याचा निकाल लवकर हाती येत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे.

NIA चे विशेष अधिकार कोणते?

  • कोणत्याही राज्यात घडलेल्या गुन्हाचा तपास व चौकशीचे अधिकार एनआयएला आहेत. त्यासाठी राज्याच्या परवानगची आवश्यकता नाही.

  • एनआयए एखाद्या प्रकरणात सुमोटाचा आधार घेत गुन्हा दाखत करु शकते.

  • गुन्हे संबंधित लोकांच्य़ा चौकशीचे आणि अटकेचे अधिकार एनआयएला आहेत.

  • विशेष कोर्टाच्या तरतुदीमुळे गुन्हे सिध्द होण्याचे प्रमाण सर्वाधिक

  • देशाबाहेरील गुन्हांचा तपास करण्याचा अधिकार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT