नवनीत आणि रवी राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा, काय असतो राजद्रोह?
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाच्या समोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणणार असं आव्हान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दोघांनी दिलं होतं. त्यानंतर झालेला राडा महाराष्ट्राने पाहिलाच. अखेर या दोघांनी आपलं आव्हान मागे घेतलं. मात्र जो काही राडा झाला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाच्या समोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणणार असं आव्हान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दोघांनी दिलं होतं. त्यानंतर झालेला राडा महाराष्ट्राने पाहिलाच. अखेर या दोघांनी आपलं आव्हान मागे घेतलं. मात्र जो काही राडा झाला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. नंतर झालेल्या सुनावणी वेळी त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचं कलमही (IPC 124 a) लावण्यात आलं. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. राजद्रोहाचा गुन्हा म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेणार आहोत.
रवी राणा आणि नवनीत राणा मुंबईत आल्यापासून काय काय घडलं?
राजद्रोहाचा गुन्हा म्हणजे काय?
इंडियन पीनल कोडचं सेक्शन 124 अ राजद्रोहसंदर्भात आहे. याचा सोप्पा अर्थ एखादी व्यक्ती सरकारविरोधात जर काही बोलत असेल, सरकारविरोधी गोष्टींचं समर्थन करत असेल. राष्ट्रीय चिन्हांचा अवमान केला, संविधानाला कमी लेखलं तर अशा व्यक्तीविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. याच घटनांना जर कोणी समर्थन देत असेल तर त्याच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.