शिवसेना ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांची रणनीती ठरली? काय आहे मिशन १८८?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरेंकडून शिवसेना ताब्यात घेण्यासाठी चंगच बांधला आहे असं दिसतं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून एकनाथ शिंदे यांनी आमदारांना आपल्या साथीला घेत बंड पुकारलं. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी म्हटलंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरेंकडून शिवसेना ताब्यात घेण्यासाठी चंगच बांधला आहे असं दिसतं आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून एकनाथ शिंदे यांनी आमदारांना आपल्या साथीला घेत बंड पुकारलं. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी म्हटलंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना वाचवण्यासाठी त्यांच्या पातळीवर संघर्ष करत आहेत.
शिवसेनेत उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे गट, शिवसैनिक संभ्रमात
या सगळ्या घडामोडी घडत असताना जर मागच्या एक महिन्यातलं निरीक्षण अभ्यासलं तर हे लक्षात येतं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं बळ आणि ताकद वाढते आहे. शिवसेनेतल्या १२ खासदारांनीही शिंदे गटाला पसंती देत एक पत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं. तसंच त्याआधीच ठाणे, नवी मुंबई आणि नवी मुंबईतले माजी नगरसेवकही एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहेत.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे कळतं आहे की एकनाथ शिंदे संपूर्ण पक्षच उद्धव ठाकरेंच्या हातून काढून घेतील. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातातून निसटणार का? या प्रश्नाचं उत्तर अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र एकनाथ शिंदे जी रणनीती आखत आहेत ती रणनीती त्याच दृष्टीने आहे हेदेखील विसरता येणार नाही.