What is Masked Aadhaar? आधार कार्डच्या फ्रॉडपासून वाचण्याचे उपाय काय आहेत?

मुंबई तक

Masked Aadhaar Card : आधार कार्ड हा आपल्या सगळ्यांच्याच ओळखीसाठीचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य किंवा अनिवार्य झालेला हा घटक आहे. मात्र या आधार कार्डचा फ्रॉडही होऊ शकतो. जर आधार कार्ड देत असताना थोडासा निष्काळजीपणा केला गेला तर हे शक्य आहे. त्यामुळेच आधार कार्ड बाबत केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स आणल्या आहेत. एवढंच नाही तर लोकांनी फक्त […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Masked Aadhaar Card : आधार कार्ड हा आपल्या सगळ्यांच्याच ओळखीसाठीचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य किंवा अनिवार्य झालेला हा घटक आहे. मात्र या आधार कार्डचा फ्रॉडही होऊ शकतो. जर आधार कार्ड देत असताना थोडासा निष्काळजीपणा केला गेला तर हे शक्य आहे. त्यामुळेच आधार कार्ड बाबत केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स आणल्या आहेत. एवढंच नाही तर लोकांनी फक्त मास्क्ड आधार कार्ड शेअर करावं असंही म्हटलं आहे. आता हे मास्क्ड आधार कार्ड म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेणार आहोत.

आधार कार्डचा चुकीचा उपयोग होऊ शकतो असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे कुठल्याही संस्थेला तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी देऊ नका. त्याऐवजी मास्क्ड आधार कार्डचा उपयोग करा असं केंद्राने सुचवलं आहे.

Masked Aadhaar Card म्हणजे नेमकं काय?

मास्क्ड आधार कार्डमध्ये तुमच्या आधारचा १२ अंकांचा पूर्ण नंबर दिसत नाही. फक्त शेवटचे चार अंक दिसतात. हे मास्क्ड आधार कार्ड तुम्ही ऑनलाईनही काढू शकता. हॉटेल किंवा सिनेमा हॉल यांसारख्या विना परवाना खासगी संस्थांना आधार कार्डची कॉपी ठेवता येत नाही. आधार अधिनियम २०१६ नुसार हा गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाच्या अॅडव्होकेट अश्विनी दुबे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp