बहुसदस्यीय प्रभाग पद्धत म्हणजे काय?, तुमच्या महापालिकेत नेमकी कोणती पद्धत आहे लागू?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यात महापालिका निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे राज्याच्या एकूणच परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने म्हणजे काय आणि सध्या कोणत्या महापालिकेत नेमकी कशी पद्धत सध्या लागू आहे हे जाणून घेऊयात सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती म्हणजे काय?

1 सदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदार एकाच उमेदवाराला मत देता येणार आहे. पण मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये मतदार तीन उमेदवारांना मतदान करु शकतात. तसंच नगरपालिका आणि नगरपरिषदा यासाठी दोन उमेदवारांना मतदान करु शकतात. तर नगरपंचायतीमध्ये मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येईल.

हे वाचलं का?

हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. मुळात भाजपने सुरुवातील 2017 साली अशाप्रकारची प्रभाग पद्धती आणली होती. पण त्यावेळी प्रत्येक महापालिकेत वेगवेगळ्या स्वरुपाची रचना होती. पण याबाबत महाविकास आघाडीने आता सुसुत्रता आणणं गरजेचं आहे.

मागील महापालिका निवडणुकीत कशी प्रभाग पद्धत होती?

ADVERTISEMENT

  • पुणे – 3 सदस्यीय प्रभाग पद्धत

ADVERTISEMENT

  • नाशिक – 2 सदस्यीय प्रभाग पद्धत

  • नागपूर – 4 सदस्यीय प्रभाग पद्धत

  • उस्मानाबाद – 2 सदस्यीय प्रभाग पद्धत

  • अहमदनगर – 4 सदस्यीय प्रभाग पद्धत

  • परभणी – 4 सदस्यीय प्रभाग पद्धत

  • मुंबई – 1 सदस्यीय प्रभाग पद्धत

  • औरंगाबाद – 1 सदस्यीय प्रभाग पद्धत

  • ठाणे – 1 सदस्यीय प्रभाग पद्धत

  • नवी मुंबई – 1 सदस्यीय प्रभाग पद्धत

  • कल्याण-डोंबिवली- 1 सदस्यीय प्रभाग पद्धत

  • पाहा महाराष्ट्रातील कोणत्या महापालिकेत कशी आहे प्रभाग पद्धत:

    नागपूर: सध्या नागपुरात 37 प्रभाग आहेत. 36 प्रभागात प्रत्येकी चार सदस्य आहेत आणि 37व्या एका प्रभागात 3 सदस्य आहेत. 2022 च्या सुरुवातीला नागपूर महानगरपालिका निवडणूक होणार आहे.

    उस्मानाबाद: उस्मानाबाद महानगरपालिकामध्ये 19 प्रभाग आहेत. 18 प्रभागात प्रत्येक 2 सदस्य आहेत आणि 19 व्या प्रभागात 3 सदस्य आहेत. डिसेंबर 2021मध्ये निवडणूक होणार आहेत

    कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका 81 प्रभागात आत्तापर्यंत एक प्रभाग एक नगरसेवक अशा पद्धतीने निवडणूक झाली आहे.

    अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेची 2023 च्या डिसेंबरला निवडणूक आहे. सध्या अहमदनगर शहरात 17 प्रभाग असून 68 नगरसेवक आहेत प्रत्येक प्रभागात 4 सदस्य आहेत.

    परभणी: परभणीत 16 प्रभाग आहेत. 16 प्रभागात प्रत्येकी चार सदस्य आहेत. 64 नगरसेवकची महापालिका आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये महानगरपालिका निवडणूक होणार आहे

    Muncipal Election 2022: महापालिका निवडणूक होणार बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने

    सोलापूर: सोलापूर महापालिकेमध्ये 26 प्रभाग आहेत. सोलापूर महापालिकेत 102 नगरसेवक संख्या आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होणार आहे. महापालिकेमध्ये बहुप्रभाग (एकापेक्षा जास्त) निवडणूक झाली होती.

    नाशिक: एकूण 122 वॉर्ड आहेत. मात्र मागील निवडणूक ही 4 वार्डचा एक प्रभाग अशा पद्धतीने झाली होती. एका प्रभागातून 4 नगरसेवक निवडून आले होते.

    सांगली: सांगली महानगरपालिका ही सांगली-मिरज आणि कुपवाड अशा तीन शहरांची मिळून बनलेली आहे. एकूण 20 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या एकूण 78 इतकी आहे. आगामी निवडणूक 2023 साली होणार आहे. यापूर्वी 2018 ची निवडणूक ही बहुसदस्य पध्दतीने घेण्यात आली होती. काही प्रभागात तीन तर काही लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या प्रभागामध्ये चार सदस्य निवडून गेले आहेत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT