Ready Reckoner Rate: रेडी रेकनर म्हणजे काय… नेमका कसा ठरवला जातो दर?

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्रात आजपासून (1 एप्रिल 2022) घर किंवा इतर संपत्ती खरेदी करणं हे महागलं आहे. कारण राज्य सरकारने रेडी रेकनर दरामध्ये वाढ केली आहे. आता हे रेडी रेकनर दर म्हणजे काय, ते नेमके कसे ठरवले जातात या सगळ्याबाबत आम्ही आपल्याला अगदी सविस्तर माहिती देणार आहोत. जाणून घ्या त्याचविषयी. नोंदणी आणि मुद्रांक विभाग हे बांधकाम आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: महाराष्ट्रात आजपासून (1 एप्रिल 2022) घर किंवा इतर संपत्ती खरेदी करणं हे महागलं आहे. कारण राज्य सरकारने रेडी रेकनर दरामध्ये वाढ केली आहे. आता हे रेडी रेकनर दर म्हणजे काय, ते नेमके कसे ठरवले जातात या सगळ्याबाबत आम्ही आपल्याला अगदी सविस्तर माहिती देणार आहोत. जाणून घ्या त्याचविषयी.

नोंदणी आणि मुद्रांक विभाग हे बांधकाम आणि जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारतं. त्यासाठी संबंधित जमीन व इमारतीचे वेगवेगळ्या निकषानुसार आणि विभागानुसार वार्षिक बाजारमूल्य ठरविले जाते. त्यालाच रेडी रेकनर असे म्हणतात.

दरवर्षी राज्य सरकार विविध क्षेत्रांवर आधारित नवीन रेडी रेकनर दर लागू करतात. रेडी रेकनर दर हा वेगवेगळ्या शहरा किंवा भागात वेगवेगळा देखील असतो. रेडी रेकनर दर हा किमान दर आहे. ज्याच्या आधारावर सरकार कोणत्याही मालमत्तेशी संबंधित व्यवहारासाठी नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क आकारते.

मुद्रांक शुल्क यांची गणना रेडी रेकनर दर किंवा व्यवहाराच्या वास्तविक मूल्यावर यापैकी जे जास्त असेल त्यावर केली जाते.

हे वाचलं का?