US Taliban Afghanistan : तालिबान म्हणजे काय? अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य परतल्याने भारत का चिंतेत? समजून घ्या
भारत आणि पाकिस्तानचे संबंध कित्येक दशकं ताणलेलेच आहेत….पण त्यात आता आणखी भर पडणार आहे ती अफगाणिस्तानची…अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी येतंय….पण याने भारताची चिंता का वाढतेय? भारताने अफगाणिस्तान दुतावासातील आपले अधिकारी परत का बोलावले? या सगळ्या घडामोडींमुळे काश्मिरमध्येही पुन्हा अशांतता पसरू शकते का? अमेरिकेने सैन्य मागे घेतल्याने भारताची डोकेदुखी वाढतेय का? आज समजून घ्या मध्ये आपण […]
ADVERTISEMENT
भारत आणि पाकिस्तानचे संबंध कित्येक दशकं ताणलेलेच आहेत….पण त्यात आता आणखी भर पडणार आहे ती अफगाणिस्तानची…अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी येतंय….पण याने भारताची चिंता का वाढतेय? भारताने अफगाणिस्तान दुतावासातील आपले अधिकारी परत का बोलावले? या सगळ्या घडामोडींमुळे काश्मिरमध्येही पुन्हा अशांतता पसरू शकते का? अमेरिकेने सैन्य मागे घेतल्याने भारताची डोकेदुखी वाढतेय का? आज समजून घ्या मध्ये आपण याच प्रश्नांची सोप्या शब्दांत उत्तरं जाणून घेणार आहोत…
ADVERTISEMENT
अफगाणिस्तानमध्ये तसं अमेरिकेचं सैन्य 20 वर्ष होतं….आणि हेच सैन्य आता 11 सप्टेंबर 2021 पर्यंत अमेरिकेत परतणार आहे…
हे वाचलं का?
पण यात आता भारतानेसुद्धा अफगाणिस्तानमधल्या कंधारमधील दुतावासातले अधिकारी परत बोलावले आहेत. जवळपास 50 जणांचा स्टाफ भारताने अफगाणिस्तामधून परत बोलावला आहे. अमेरिकी सैन्य परतल्याने अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं वर्चस्व वाढू लागलंय…आणि त्याचीच चिंता आता भारताला सतावतेय. अर्थात आपली अँम्बेसी पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही. अफगाणी स्टाफ तिथे अजून कार्यरत आहे.
पण भारताने असं का केलं असेल? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं वळून पाहावं लागेल. तालिबान काय आहे? अफगाणिस्तानमध्ये त्याची दहशत कशी पसरली आणि भारतासाठी नेमकं काय चिंतेची बाब आहे ते जाणून घेऊ.
ADVERTISEMENT
1979 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तत्कालीन सोविएत युनियनने हल्ला केला…सोविएत युनियनविरोधात अनेक मुजाहिद्दीनच्या संघटना अफगाणिस्तानमध्ये उदयास आल्या. सोविएत युनियनने हल्ले थांबवल्यानंतरही या संघटनांनी आपली हत्यारं सोडली नाहीत….प्रत्येक संघटनेला आपला दबदबा तयार करायचा होता…या संघटनांमध्येच एक ग्रूप होता तालिब, ज्यामध्ये इस्लाम धर्माची शिकवण घेणारे विद्यार्थी होते. सोविएतच्या हल्ल्यात त्यातील ओमर नावच्या मुलगा जखमी झाला…पुढे जाऊन याच ओमरच्या नेतृत्वात 1994 मध्ये तालिबान उदयास आली.
ADVERTISEMENT
समजून घ्या : एक देश एक रेशन कार्ड योजना आहे तरी काय?
सुरूवातीला अराजकतेच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणणारी तालिबान लोकप्रिय झाली खरी, मात्र नंतर धर्म पुढे करत कट्टरतावादी विचार पुढे करणं, भर चौकात आरोपींना फाशी देणं, अवयव कापणं, महिलांना बुरख्याची सक्ती करणं, संगीत-सिनेमावर बंदी घालणं, मुलींना 10 वर्षांच्या पुढे शिकू न देणं या सगळ्यामुळे तालिबानची दहशत तयार झाली.
याच तालिबान संघटनेनेचा फायदा भारताविरोधातील आपले मनसुबे रचायला होईल या आशेने पाकिस्तानचं लष्कर आणि पाकची गुप्तचर यंत्रणा ISI ने तालिबानला पैसा, हत्यारं, प्रशिक्षण द्यायला मदत केली.
याच मदतीच्या आधारे 1996 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवरही ताबा मिळवला. पण तरीही कंधार हाच तालिबानचा गड मानला जातो. 1996 मध्ये तालिबान अफगाणिस्तानमध्ये 5 वर्ष सत्तेत राहिला….तालिबान सरकारची चावी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI कडे असंच मानलं जात होतं. या घडामोडी पाहता भारताने आपला दूतावास बंद केला.
24 डिसेंबर 1999 ला नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या भारतीय एअरलाईन्सचं फ्लाईट हायजॅक करण्यात आलं. भारत-पाकिस्तान-यूएई करत अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये हे विमान आणण्यात आलं. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार होतं. भारत अर्थात या सरकारला जुमानत नव्हतं…पण या फ्लाईटमध्ये भारतीय असल्यामुळे तालिबानची मदत घ्यावी लागली. भारतीयांच्या बदल्यात तालिबानला भारताच्या ताब्यातील 3 दहशतवादी हवे होते…यातील एक होता मसूद अजहर…तोच मसूद ज्याने पुढे जाऊन जैश-ए-मोहम्मद ही दहतवादी संघटना स्थापन केली, ज्या संघटनेचा 2001 मध्ये संसदेवरील हल्ला आणि 2016 मध्ये पठाणकोट बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हात होता.
What is Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे काय? समजून घ्या
1999 भारताचं विमान हायजॅक झालं, आणि नंतर 2001 मध्ये अमेरिकेलीत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अल कायद्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आश्रय दिल्याचा आरोप आहे. 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर प्रतिहल्ला केला, आणि तालिबानला सत्तेपासून हटवलं. त्यानंतर 2001 पासून ते 2021 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं सैन्य आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या शांततेच्या करारानुसार 11 सप्टेंबर 2021 पर्यंत आपलं सैन्य अमेरिका मागे घेणार आहे. जे आता जवळपास 90 टक्के परतेलेलं आहे.
पण आता अमेरिकी सैन्य माघारी गेल्याने तालिबान आपली पाळंमुळं पुन्हा मजबूत करेल… आपण आतापर्यंतचा सगळा इतिहास पाहता कंधारमध्ये आता तालिबान पुन्हा एकदा पाया भक्कम करण्यासाठी धडपड करेल, यात शंका नाही. तालिबान दावा करतंय की 85 टक्के जिल्हे त्यांनी आपल्या ताब्यात मिळवले सुद्धा आहेत. अर्थात हे कुणी पडताळून पाहू नाही शकत. पण अफगाणिस्तानमधील 421 जिल्ह्यांपैकी एक तृतीयांश जिल्ह्यांवर तालिबानने आपला दबदबा पुन्हा तयार केलाय, अशी माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये आहे.
त्यामुळे कंधार हा तालिबानचा गड असल्याने तिथल्या दुतावासातील भारतीय अधिकाऱ्यांना वायुसेनेचं विमान पाठवून परत आणण्यात आलंय…दूतावास बंद करण्यात आलेलं नाही, फक्त आपली लोक परत बोलावून घेण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
Co-operation Ministry : मोदी-शाहांची का आहे सहकार खात्यावर नजर? काय असतं सहकार? समजून घ्या
तालिबान अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सक्रीय होणार याचा फायदा पाकिस्तान घेईल, आणि काश्मिरमध्येही अशांतता पसरवेल अशीही भीती व्यक्त केली जाते. शिवाय 2001 मध्ये जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमधलं तालिबानचं सत्ता उधळली, तेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये त्यांची संसद भवनपासून ते शाळा-रस्त्यांसारख्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी भारताने तब्बल 22 हजार कोटी खर्च केले आहेत. पण या गुंतवणुकीवर आता संकट आहे, कारण अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानची सत्ता येण्याची चाहूल आहे. अमेरिकेचं सैन्य 20 वर्षे अफगाणिस्तानमध्ये असूनही तालिबानचा नायनाट करू शकलं नाही. त्यामुळे आता अमेरिकी सैन्य मागे गेल्याने भारतानेही धोक्याची घंटा आधीच ओळखून आपले अधिकारी परत बोलावले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT