खंडग्रास सूर्य ग्रहणाचं ‘मराठवाडा कनेक्शन’ आहे तरी काय?

मुंबई तक

आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. १३०० वर्षांनंतर एकाच राशीत ग्रह येण्याचा आणि २७ वर्षांनंतर दिवाळीत ग्रहण येण्याचा हा योग आज अनुभवता येतो आहे. या ग्रहणाचं मराठावाडा कनेक्शन काय आणि कसं असणार हे ग्रहण याची माहिती या २४ ऑक्टोबरला दिवाळी आणि २६ ऑक्टोबरला गोवर्धन पूजा आहे. दरवर्षी गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी होते, परंतु यावेळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. १३०० वर्षांनंतर एकाच राशीत ग्रह येण्याचा आणि २७ वर्षांनंतर दिवाळीत ग्रहण येण्याचा हा योग आज अनुभवता येतो आहे. या ग्रहणाचं मराठावाडा कनेक्शन काय आणि कसं असणार हे ग्रहण याची माहिती या २४ ऑक्टोबरला दिवाळी आणि २६ ऑक्टोबरला गोवर्धन पूजा आहे. दरवर्षी गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी होते, परंतु यावेळी तसे होणार नाही. कारण २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी आंशिक सूर्यग्रहण होणार आहे. या दोन सणांमध्ये सूर्यग्रहण आणि बुध, गुरू, शुक्र, शनि आपापल्या राशीत असल्याने गेल्या १३०० वर्षांत असा योग जुळून आलेला नाही. हे ग्रहण भारतातील बहुतांश भागात दिसणार आहे.

या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आज होतंय. हे खंडग्रास सूर्यग्रहण आहे. दिवाळीत सूर्य ग्रहण दिसण्याचा हा योग २७ वर्षांनंतर जुळून आलाय. १९९५ ला असंच दिवाळीत सूर्य ग्रहण झालं होतं. तर १३०० वर्षांनंतर सूर्यग्रहणात बुध, गुरू, शुक्र, शनि आपापल्या राशीत असण्याचा योग जुळून आलाय. आजचं हे ग्रहण भारतातील बहुतांश भागात दिसणार आहे.

सूर्य ग्रहण कुठे दिसणार

लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशचा पश्चिम भागात हे ग्रहण दिसणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp