प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये फुंकणार प्राण?; पक्ष नेतृत्वासमोर मांडली विजयाची ‘रणनीती’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मागील काही दिवसांपासून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेतृत्वामध्ये चर्चा सुरू असून, काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस सातत्याने पराभवाला सामोरं जात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशांत किशोर यांनी विजयासाठीची रणनीती मांडली आहे.

ADVERTISEMENT

राहुल गांधी यांचं नेतृत्व पक्षाला सक्षम करू शकलं नाही. त्यानंतर G23 तले नेते उघडपणे पक्षावर टीका करू लागले. काँग्रेसची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी झाली आहे असं शरद पवारांनीही सांगितलं. यानंतर २०२४ च्या निवडणुकांसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा होऊ लागली. अशात रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला फिनिक्स भरारी घेण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला आहे.

काय म्हटलं आहे प्रशांत किशोर यांनी?

हे वाचलं का?

इंडिया टुडेच्या हाती प्रशांत किशोर यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्याचा काही भाग आला आहे. त्यात प्रशांत किशोर यांनी काय मांडलं आहे आपण पाहू.

लोकसभा निवडणूक १९८४ आणि लोकसभा निवडणूक २०१९ या दोन्हीची तुलना करणारं एक प्रेझेंटेशन आहे. त्यात प्रशांत किशोर म्हणत आहेत की १९८४ ला ५४३ पैकी ४१४ जागा मिळाला होत्या. काँग्रेसचा सर्वात उत्कृष्ट परफॉर्मन्स १९८४ ला होता. इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. राजीव गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा होती. त्यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवण्यात आली त्यावेळी काँग्रेसने ५४३ पैकी ४१४ जागा जिंकल्या होत्या याची आठवण प्रशांत किशोर यांनी करून दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीचं प्रेझेंटेशन प्रशांत किशोर यांनी दिलं त्यामध्ये २०१९ ला तुरळक ठिकाणी काँग्रेस राहिली आहे. केरळ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू या राज्यांमध्ये सत्ता उरली. जी पडझड इतक्या वर्षात झाली ती या दोन प्रेझेंटेशन दिलं. १९७१ ते ७७ या काळात २४ पैकी १५ राज्यांमध्ये काँग्रेस होती.

यानंतर प्रशांत किशोर यांनी २०२४ चा काँग्रेसचा रोड मॅप काय असला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न केला. २०२४ समोरच्या शक्यता मांडल्या. प्रशांत किशोर या प्रेझेंटेशनमध्ये म्हणतात की १७ राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपची थेट लढत आहे तिथे काँग्रेस स्वबळावर लढावं. काँग्रेसने कुणासोबतही युती करू नये असा सल्ला दिला आहे. त्यानंतर ते म्हणतात स्वबळावर काँग्रेसवर लढली तर जिंकण्याची शक्यता खूप कमी आहे. पण त्याचा परिणाम भविष्यात चांगला होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

त्यानंतर प्रशांत किशोर म्हणतात की मोदींविरोधात जी विरोधकांची तिसरी आघाडीला सोबत घेतलं म्हणजे UPA ३ हा अजेंडा समोर ठेवून काँग्रेस गेलं तर जिंकण्याची शक्यता ही मध्यम प्रमाणात आहे. काँग्रेस मित्रपक्षांसोबत गेली तर तेदेखील शक्य आहे. त्यावेळीही जिंकण्याची शक्यता कमी प्रमाणात आहे असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. हा फॉर्म्युला असा आहे की बऱ्याच ठिकाणी काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाच्या आणि काही ठिकाणी मित्र पक्षांना घेऊन लढावं त्याने मोदींना हरवण्याची शक्यता वाढते असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणतात प्रशांत किशोर?

१७ राज्यांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढावं असा महत्त्वाचा सल्ला काँग्रेसला प्रशांत किशोर यांनी दिला आहे. पाच राज्यांमध्ये काँग्रेसने प्रादेशिक पक्षांसोबत जावं असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये काँग्रेसने दुय्यम भूमिका घ्यावी. तिथल्या पक्षांना महत्त्व देऊन काँग्रेसने लहान भावाच्या भूमिकेत जावं असंही प्रशांत किशोर यांनी सुचवलं आहे.

कोणत्या प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसने गेलं पाहिजे?

झारखंड मुक्ती मोर्चा, DMK, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष असला पाहिजे असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात शक्य असलेले युतीचे पर्याय म्हणून प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला गृहित धरलेलं नाही. तशीच भूमिका त्यांनी घेतली आहे. १७ राज्यं अशी आहेत जिथे काँग्रेस इतर पक्षांसोबत जाऊन राज्यं आणावीत असं सुचवलं आहे..

काँग्रेसचं नेतृत्व कुणी करावं? याबाबत काय म्हणतात प्रशांत किशोर?

काँग्रेसचं नेतृत्व कुणी करावं याबाबत महत्त्वाचं वक्तव्य प्रशांत किशोर यांनी दिलं आहे. काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा प्रशांत किशोर म्हणाले की UPA च्या अध्यक्षपदासाठी दोन पर्याय दिले आहेत. काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्याने काँग्रेसंच नेतृत्व करावं आणि काँग्रेसचं अध्यक्षपद हे सोनिया गांधींकडे असावं असा पर्याय प्रशांत किशोर यांनी दिला आहे. हंगामी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष बिगर गांधी चेहरा असावा असंही त्यांनी सुचवलं आहे.

संसदीय बोर्डाचं नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे असावं तर महासचिव म्हणून प्रियंका गांधींनी काम करावं असंही प्रशांत किशोर यांनी सुचवलं आहे. याला पर्याय दिला आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की युपीएच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनी स्वतःकडे ठेवावं. काँग्रेसचं अध्यक्षपद हे बिगर गांधी चेहरा असावा असंही त्यांनी मह्टलं आहे. हा पर्याय स्वीकारला तर हंगामी अध्यक्ष कुणीच असू नये. तर संसदीय मंडळाचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी असाव्यात असं सांगितलं. काँग्रेसचा अध्यक्ष जर बिगर गांधी परिवारातला असेल तर खूप मोठा फरक पडू शकतो असंही प्रशांत किशोर यांनी सुचवलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT