Raj Kundra चा पोलिसांपासून वाचण्यासाठीचा प्लान B काय होता?
शिल्पा शेटीचा पती राज कुंद्रा याच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. राज कुंद्राला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मंगळवारीच त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याच्या जामिनावर जी सुनावणी झाली त्यातही त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. राज कुंद्रा आणि पॉर्न फिल्म प्रकरणात रोज नवेनवे खुलासे […]
ADVERTISEMENT

शिल्पा शेटीचा पती राज कुंद्रा याच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. राज कुंद्राला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मंगळवारीच त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याच्या जामिनावर जी सुनावणी झाली त्यातही त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. राज कुंद्रा आणि पॉर्न फिल्म प्रकरणात रोज नवेनवे खुलासे होत आहेत. अशात आता क्राईम ब्रांच्या चार्जशीटमध्ये एका PPT चा म्हणजेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा उल्लेख केला आहे. एवढंच नाही तर काही whats app चॅटच्या मदतीने राज कुंद्राचा प्लान बी काय होता तेदेखील समजलं आहे.

राज कुंद्राला अटक करण्याआधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) पॉर्न फिल्म प्रकरणात खोलवर तपास केला. ज्यावेळी राज कुंद्राचा साथीदार उमेश कामतला अटक झाली तेव्हा पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. या पुराव्यांच्या आधारेच एप्रिल महिन्यात चार्जशीट फाईल करण्यात आली. या चार्जशीटमध्ये पॉर्न फिल्म व्हीडिओजच्या माध्यमातून तीन वर्षांमध्ये किती कमाई होणार याची माहिती समोर आली आहे. या चार्जशीटची एक कॉपी इंडिया टुडेच्या हाती लागली आहे. जाणून घ्या ग्रॉस रेव्हेन्यू आणि प्रॉफिट बद्दल
वर्ष 2021-22









