राजकीय सुडापोटी राष्ट्रपती राजवट लावता येते? काय आहेत तरतुदी?

मुंबई तक

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. आपण जाणून घेऊ राष्ट्रपती राजवट काय असते? त्याच्या तरतुदी काय असतात आपण जाणून घेऊ. भारतीय संविधानातील आर्टिकल 356 नुसार कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट तेव्हा लावली जाते, जेव्हा त्या राज्याचा कारभार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. आपण जाणून घेऊ राष्ट्रपती राजवट काय असते? त्याच्या तरतुदी काय असतात आपण जाणून घेऊ.

भारतीय संविधानातील आर्टिकल 356 नुसार कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट तेव्हा लावली जाते, जेव्हा त्या राज्याचा कारभार हा संविधानातील दिलेल्या मूल्यांनुसार चालत नाही. याच कलमामुळे राष्ट्रपतींना हा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. राज्य सरकार घटनात्मक मूल्यांचं पालन न करता, संविधानिक पद्धतीने कारभार चालत नसेल असा अहवाल जर राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवला तर राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लावू शकतात.

राज्याची परिस्थिती हाताळण्यात सरकार जर अक्षम ठरत असेल, तर ती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रपती एक्झिक्युटीव्ह पॉवर्स ज्या असतात, ते आपल्या हातात घेतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp