भारतात कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या ट्रिपल म्युटंट व्हायरसमुळे WHO ही चिंतेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात कोरोनाचा कहर माजवणाऱ्या ट्रिपल म्युटंट व्हायरसमुळे WHO ही चिंतेत आहे. भारतात ज्या पद्धतीने कोरोना वाढतो आहे तसाच परिणाम जगातही होईल का? असा प्रश्न आता WHO ला पडला आहे. या ट्रिपल म्युटंटची चिंता आता WHO लाही वाटू लागली आहे. आता या संदर्भात WHO ने सतर्कता बाळगा असं म्हटलं आहे.

WHO च्या टेक्निकल विभागाच्या प्रमुख मारिया केरखोव यांनी सांगितलं की आम्ही जे निरीक्षण करत आहोत त्यानुसार या व्हायरसचा B.1.617 हा व्हेरिएंट ओरिजनल व्हायरसपेक्षा जास्त वेगाने संसर्ग पसरवतो आहे. या व्हायरस व्हेरिएंटमुळे लस घेतल्यानंतरही काही प्रमाणात कोरोनाचा धोका असू शकतो. यासंदर्भात आम्ही अधिक अभ्यास करतो आहोत.

चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात 18 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मारिया यांनी काय म्हटलं आहे?

भारतात व्हायरसचा जो व्हेरिएंट आढळला आहे त्यामुळे आम्ही जगभरासाठी चिंतेत आहोत. कारण प्राथमिक अभ्यासातच आम्हाला हे समजलं आहे की या व्हेरिएंटमुळे कोरोना प्रसार वेगाने होतो आहे. याबाबत आम्ही आणखी माहिती मिळवण्यासाठी अभ्यास आणि निरीक्षणं करत आहोत.

ADVERTISEMENT

WHO ची जगभरातल्या 10 व्हेरिएंट्सवर नजर

ADVERTISEMENT

WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटना जगभरातल्या कोरोनाच्या 10 व्हायरस व्हेरिएंटवर लक्ष ठेवून आहे. या मध्ये अर्थातच B.1.617 या व्हेरिएंटचाही समावेश आहे. या व्हेरिएंटने भारतात दुसऱ्या लाटेत कहर माजवला आहे. व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट या कॅटेगरीमध्ये ठेवून आम्ही त्यासंदर्भातला अभ्यास सुरू केला आहे. ही कॅटेगरी अशासाठी ठेवण्यात आली आहे कारण हा प्रकार चिंता वाढवणारा आहे. जर आता हा व्हायरस घातक आहे असं निरीक्षणानंतर लक्षात आलं तर त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न कॅटेगरीमध्ये ठेवल जाईल. जर हे व्हेरिएंट किंवा कोणतंही व्हेरिएंट या कॅटेगरीत गेलं तर त्यामुळे जगाची चिंता वाढणार आहे.

‘कोरोना व्हायरस आपल्या सहनशीलतेची परीक्षा पाहतोय एकत्र लढूयात’, ‘मन की बात’मधून मोदींचं जनतेला आवाहन

लसीकरणाबाबत WHO चं म्हणणं काय?

लसीकरण हाच संक्रमण थांबवण्याचा प्रमुख उपाय आहे. अनेक लसी या प्रभावी ठरत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होतो.

व्हायरसचा ट्रिपल म्युटंट व्हेरिएंट काय आहे?

कोरोनाची पहिली लाट आणि ओसरली, आता दुसऱ्या लाटेत कोरोना व्हायरसने कहर माजवला आहे. याचं मुख्य कारण आहे व्हायरसचं व्हेरिएंट अर्थात व्हायरसने बदलेलं रूप किंवा प्रकार. भारतात आज घडीला अॅक्टिव्ह असलेल्याल व्हायरसला B.1.617 हे नाव दण्यात आलं आहे. यामध्ये SARS- COV 2 चे दोन म्युटंट आहेत. म्हणजेच SARS COV 2 चा मूळ व्हायरस होता त्यात बदल झाला आहे. E484Q, L452R अशी या म्युटंटची नावं आहेत. यापैकी E484Q हा म्युटंट ब्रिटन, साऊथ अफ्रिका या देशांमध्ये मिळालेल्या व्हेरिएंटशी साम्य सांगणारा आहे. तर L452R या म्युटंटमुळे अमेरिकेत कोरोना झपाट्याने वाढला होता.

हे दोन्ही बदल दुसऱ्या देशांमध्येही झाल्याचं समोर आलं आहे. मात्र भारतात पहिल्यांदा असं घडलं आहे की एकाच व्हेरिएंटमध्ये दोन बदल झाले आहेत. त्यामुळे याला डबल म्युटंट कोरोना व्हायरस असं म्हटलं जातं आहे. एवढंच नाही तर या दोन प्रमुख बदलांशिवायही काही बदल या व्हेरिएंटमध्ये झाले आहेत. त्यामुळेच या व्हायरसचं ट्रिपल म्युटंट म्हटलं जातं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT