Param Bir Singh: मुंबईचं पोलीस आयुक्त पद गमावलेले परमबीर सिंग नेमके आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अँटेलिया आणि सचिन वाझे प्रकरणी हलगर्जी केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (IPS Parambir Singh) यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन (Mumbai Police Commissioner) हटविण्यात आलं. पण त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर परमबीर सिंग यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परमबीर सिंग नेमके आहेत तरी कोण हे आम्ही आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहोत.

जाणून घ्या परमबीर सिंग यांच्याविषयी संपूर्ण माहिती:

परमबीर सिंग यांचा जन्म हरियाणातील मोहबताबाद येथे झाला. त्यांचे वडील होशियार सिंग हे देखील हरियाणा नागरी सेवेत प्रशासकीय अधिकारी होते. वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन परमबीर सिंग यांनी थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षेत देत भारतीय प्रशासकीय सेवेत आयपीएस अधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परमबीर सिंग हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंग यांनी बराच काळ महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईत काम केलं आहे. महाराष्ट्र पोलिसात त्यांनी विविध पदांवर काम केलेलं आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती होण्याआधी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) महासंचालक होते. तर त्याआधी त्यांच्यावर ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी होती.

मोठी बातमी: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली, सचिन वाझे प्रकरण भोवलं

ADVERTISEMENT

याशिवाय त्यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख म्हणून देखील काम पाहिलं होतं. दरम्यान, काही काळ त्यांनी चंद्रपूर आणि भंडाऱ्याचे पोलीस अधिक्षक म्हणून देखील काम पाहिलं होतं.

ADVERTISEMENT

90 च्या दशकातही परमबीर सिंग होते चर्चेत

90 च्या दशकात परमबीर सिंग हे चर्चेत आले होते. कारण यावेळी सहआयुक्त अरविंद इनामदार यांनी स्पेशल ऑपरेशनसाठी एक खास पथक तयार केलं होतं. ज्या पथकात डीसीपी म्हणून परमबीर सिंग यांचा देखील समावेश होता.

या पथकाने मुंबई पोलिसांच्या इतिहासात सर्वात जास्त एन्काउंटर केल्याचा रेकॉर्ड असल्याचं बोललं जात आहे. तेव्हा परमबीर सिंग यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने कुख्यात गुंड अरुण गवळीच्या दगडी चाळीत अनेक कारवाया केल्या होत्या. त्यामुळे अंडरवर्ल्डशी खडानखडा माहिती असणारे अधिकारी अशी परमबीर सिंग यांची ओळख आहे.

मुंबई पोलिसांना मिळाले नवे बॉस, जाणून घ्या कोण आहेत हेमंत नगराळे?

याशिवाय मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीदरम्यान देखील ते चर्चेत आले होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना एटीएसने अटक केली होती. त्यावेळी एटीएसचे प्रमुख हे हेमंत करकरे होते मात्र त्यावेळी परमबीर सिंग हे एटीएसचे उपप्रमुख होते आणि त्यांच्याकडेच या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी होती.

अंडरवर्ल्ड स्पेशालिस्ट अशी परमबीर सिंग यांची ओळख

1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी देखील परमबीर सिंग यांनी काही प्रमाणात तपास केला होता. तसंच एका आरोपीला त्यांनी अटकही केली होती. त्यामुळे परमबीर सिंग यांना अंडरवर्ल्डची चांगली माहिती असल्याचं बोललं जातं. याशिवाय ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांनी ड्रग्स रॅकेट केसमध्ये बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला थेट आरोपी बनवलं होतं. तसंच ममताचा पती विकी गोस्वामी हा देखील या केसमध्ये आरोपी होता.

दाऊदच्या भावाला अटक करण्यात परमबीर सिंगानी बजावली होती मोठी भूमिका

सप्टेंबर 2017 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्या अटकेवेळी परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. खंडणीसाठी बिल्डरला धमकावल्या प्रकरणी इक्बाल कासकरला ठाण्याच्या क्राइम ब्रांचने अटक केली होती. तेव्हा पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांनी या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT