संजय दत्त, सलमान खान आणि आता आर्यन: कोण आहेत वकील सतीश मानेशिंदे, ज्यांना बॉलिवूडकरांची पसंती?
मुंबई: 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त असो की काल-परवाचं रिया चक्रवर्ती प्रकरण या सगळ्यात एक गोष्ट समान होती. ती म्हणजे बॉलिवूडच्या या कलाकारांची बाजू मांडणारे वकील. होय… बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना काही वेळेस कायदेशीर बाबींना तोंड द्यावं लागलं आहे. अशावेळी त्यांची बाजू हे ज्येष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे हे मांडत आले आहेत. सतीश मानेशिंदेंचं बोट धरूनच […]
ADVERTISEMENT

मुंबई: 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त असो की काल-परवाचं रिया चक्रवर्ती प्रकरण या सगळ्यात एक गोष्ट समान होती. ती म्हणजे बॉलिवूडच्या या कलाकारांची बाजू मांडणारे वकील. होय… बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना काही वेळेस कायदेशीर बाबींना तोंड द्यावं लागलं आहे. अशावेळी त्यांची बाजू हे ज्येष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे हे मांडत आले आहेत.
सतीश मानेशिंदेंचं बोट धरूनच मुंबईचं पेजथ्री विश्व कोर्टाची पायरी चढतं. शाहरूखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली. याच प्रकरणात शाहरूखने देखील सतिश मानेशिंदे यांनाच आपल्या मुलाची बाजू कोर्टात मांडण्यासाठी वकील म्हणून नेमलं. त्यामुळे कोण आहेत हे सेलिब्रिटी वकील सतीश मानेशिंदे आणि ते बॉलिवूडच्या सेलिब्रिटींमध्ये एवढे फेमस का आहेत, तेच आपण आता जाणून घेऊयात.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकला आहे. एनसीबीनं त्याला अटक केली आहे. शाहरूखने आपल्या मुलाची बाजू मांडण्यासाठी सतिश मानेशिंदे यांना नेमलं आहे. मानेशिंदे किला कोर्टासमोर आर्यनची बाजू मांडणार आहेत. त्यांनी या आधीही वेळोवेळी सेलिब्रेटींची बाजू मांडली आहे.
56 वर्षांचे सतीश मानेशिंदे हे मूळचे धारवाडचे आहेत. त्यांनी मुंबईतच वकिलीचं शिक्षण घेतलं आणि इथेच वकिली सुरू केली. सतिश मानेशिंदे हे नाव हाय प्रोफाईल, सेलिब्रिटी प्रकरणांसाठी काही नवं नाही. त्यांनी याआधीही बॉलिवूडमधल्या अनेक स्टार्सची बाजू मांडली आहे. पण त्यांच्या करिअरला खरी कलाटणी मिळाली ती संजय दत्त प्रकरणामुळे.










