महाराष्ट्राचं गृहखातं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब?-फडणवीस
महाराष्ट्राचं गृहखातं कोण चालवतं? राष्ट्रवादी की शिवसेना असा प्रश्न मला पडला आहे. याचं महत्त्वाचं कारण हे आहे की सभागृहात गृह विभागाशी संबंधित प्रश्न विचारले गेले तेव्हा उत्तर दिलं ते अनिल परब यांनी. त्यामुळे नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप कुणाचा? हे आता स्पष्ट झालं पाहिजे असंही आज देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचं गृहखातं कोण चालवतं? राष्ट्रवादी की शिवसेना असा प्रश्न मला पडला आहे. याचं महत्त्वाचं कारण हे आहे की सभागृहात गृह विभागाशी संबंधित प्रश्न विचारले गेले तेव्हा उत्तर दिलं ते अनिल परब यांनी. त्यामुळे नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप कुणाचा? हे आता स्पष्ट झालं पाहिजे असंही आज देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सचिन वाझेंनी ज्या ज्या कार वापरल्या त्या काही कार मागील सहा महिन्यांमध्ये कुणी-कुणी वापरल्या हे देखील स्पष्ट झालं पाहिजे अशी मागणी आता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही-शरद पवार
हे वाचलं का?
परमबीर सिंग यांच्या आरोपांबाबत काय म्हणाले फडणवीस?
परबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या आधी सुबोध जैस्वाल यांनीही आरोप केले होते. ते आरोपही गंभीर होते आहे. परबमीर सिंग यांनी त्यांच्या पत्रातून केलेले आरोप हे अत्यंत गंभीर आरोप आहेत. जैस्वाल यांनीही बदल्याचं रॅकेट कसं चालतं ते सांगितलं होती. त्यांची दखल त्यावेळी कुणीही घेतली नव्हती. महाराष्ट्रात बदल्याचं रॅकेट कसं चालतं त्यासंदर्भात हे पत्र लिहिण्यात आलं होतं. आता त्यापाठोपाठ परमबीर सिंग यांनी आरोप केले आहेत असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया..
ADVERTISEMENT
परमबीर सिंग यांनी लावलेला आरोप हा पहिला आरोप नाही. शरद पवार असं म्हणाले की परमबीर सिंग यांची बदली होत होती त्यामुळे त्यांनी हा आरोप लावला पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली होत होत नव्हती. रश्मी शुक्ला यांची बदली होत नव्हती तरीही त्यांनी आरोप केले होते मात्र त्यांचे आरोप, त्यांच्या पत्रांकडे लक्ष दिलं गेलं नाही. एखादा निलंबित व्यक्ती जर सरकारने सेवेत पुन्हा घेतला तर त्याला एक्झुकिटिव्ह पोस्ट देता येत नाही हे मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माहित नाही का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT