Ganesh Utsav 2022 : सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरू केला? लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी?
महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरू केला हा प्रश्न कुणीही विचारला तर कुणीही सांगेल याचं उत्तर लोकमान्य टिळक हेच याचं उत्तर आहे. मात्र पाच वर्षांपूर्वी गणेशोत्सव नेमका कुणी सुरू केला याचा वाद सुरू झाला. गणेशोत्सवाचे जनक नेमके कोण? लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी? असा हा वाद सुरू झाला. आपण जाणून घेऊ याचविषयी. भारत पारतंत्र्यात असताना लोकमान्य […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरू केला हा प्रश्न कुणीही विचारला तर कुणीही सांगेल याचं उत्तर लोकमान्य टिळक हेच याचं उत्तर आहे. मात्र पाच वर्षांपूर्वी गणेशोत्सव नेमका कुणी सुरू केला याचा वाद सुरू झाला. गणेशोत्सवाचे जनक नेमके कोण? लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी? असा हा वाद सुरू झाला. आपण जाणून घेऊ याचविषयी.
भारत पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरूवात केली आणि स्वातंत्र्य चळवळ त्यातून सुरू केली हे आपल्याला माहित आहेच. मात्र सुरूवात कुणी केली याचा वाद 2017 मध्ये समोर आला.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना समोर आणली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीची ज्योत पेटवली. मात्र लोकमान्य टिळक नव्हे तर भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वात आधी गणेशोत्सव सुरू केला असा दावा भाऊ साहेब रंगारी ट्रस्टने केला.