राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख तात्काळ का गेले दिल्लीला?

मुंबई तक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाने CBI चौकशीचे आदेश दिल्यानंतर तात्काळ आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुपूर्द केल्यानंतर ते तात्काळ राजधानी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. राजीनामा देताच अनिल देशमुख हे दिल्लीला का गेले? असा प्रश्न अनेक जण विचारु लागले आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाने CBI चौकशीचे आदेश दिल्यानंतर तात्काळ आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुपूर्द केल्यानंतर ते तात्काळ राजधानी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. राजीनामा देताच अनिल देशमुख हे दिल्लीला का गेले? असा प्रश्न अनेक जण विचारु लागले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वरुन जाऊन अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सुपूर्द केला आणि त्यानंतर ते तात्काळ विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी थेट दिल्लीची वाट धरल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा देखील सुरु झाली होती.

दरम्यान, याबाबत आता अशी माहिती समोर येत आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्या याचिकेवर दिलेल्या निर्णयात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. याच आदेशानंतर अनिल देशमुख यांनी आपला गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. पण उच्च न्यायालयाच्या याच निर्णयाला आव्हान देण्यासाठी अनिल देशमुख यांनी तात्काळ दिल्ली गाठली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख हे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. याचसाठी अनिल देशमुख यांनी मुंबईहून थेट दिल्लीचं विमान पकडलं आहे. दिल्लीत पोहचाताच ते आपली याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार असल्याचं समजतं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp