Indian Independence Day: 15 ऑगस्ट ही तारीख स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडली गेली?
Independence Day 2021: देशात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस आहे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी मधरात्रीच्या सुमारास आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. जाणून घ्या त्यामागची रोचक कथा काय आहे. तसंच आपल्याला याच दिवशी स्वातंत्र्य का मिळालं? हाच दिवस स्वातंत्र्य देण्यासाठी […]
ADVERTISEMENT

Independence Day 2021: देशात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस आहे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी मधरात्रीच्या सुमारास आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. जाणून घ्या त्यामागची रोचक कथा काय आहे. तसंच आपल्याला याच दिवशी स्वातंत्र्य का मिळालं? हाच दिवस स्वातंत्र्य देण्यासाठी का निवडला गेला? यासारखे अनेक इंटरेस्टिंग आता आपण जाणून घेणार आहोत.
यापूर्वी 1930 ते 1947 पर्यंत 26 जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता. लाहोर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सत्रात भारताने संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर भारतीय नागरिकांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सविनय कायदेभंगाच्या चळवळीची विनंती केली होती.
त्यावेळी भारतात लॉर्ड माउंटबॅटन हे भारतातील व्हॉईसरॉय होते. माउंटबॅटन यांनीच वैयक्तिकरित्या 15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून निश्चित केला होता. असे म्हटले जाते की, हा दिवस ते त्यांच्या कार्यकाळासाठी खूपच भाग्याचा आणि चांगला मानत असे. यामागील दुसरे विशेष कारण असे होते की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान, 15 ऑगस्ट, 1945 रोजी जपानी सैन्याने त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनसमोर शरणागती पत्करली होती.
माउंटबॅटन तेव्हा सर्व देशांच्या सहयोगी सैन्याचे कमांडर होते. लॉर्ड माउंटबॅटन यांनी 3 जूनच्या स्वातंत्र्य आणि फाळणीच्या संदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. 3 जूनच्या बैठकीत भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस देखील ठरवण्यात आला होता.