बच्चू कडू खरं बोलले की खोटं? आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?
मुंबई : महाराष्ट्रातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) त्यांच्या एका वक्तव्याने ईशान्येकडील राज्य आसाममध्ये (Assam) चांगलेच चर्चेत आहे. इतके की कडू यांच्या या वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेतही उमटले. आसाम विधानसभेत राज्यपालांचं अभिभाषण सुरु असताना तिथल्या काही आमदारांनी अभिभाषण थांबवून बच्चू कडूंच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. (MLA Bacchu Kadu […]
ADVERTISEMENT

मुंबई : महाराष्ट्रातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) त्यांच्या एका वक्तव्याने ईशान्येकडील राज्य आसाममध्ये (Assam) चांगलेच चर्चेत आहे. इतके की कडू यांच्या या वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेतही उमटले. आसाम विधानसभेत राज्यपालांचं अभिभाषण सुरु असताना तिथल्या काही आमदारांनी अभिभाषण थांबवून बच्चू कडूंच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. (MLA Bacchu Kadu statment on assam dog meat)
काय म्हणाले होते बच्चू कडू?
आमदार बच्चू कडू म्हणाले होते, “महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथं त्यांना चांगली किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसं तिकडचे लोक कुत्र्याचं मांस खातात. या कुत्र्यांचा व्यापार होईल. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली, असं ते म्हणाले होते.
पण खरंच आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?
विकास छेत्री यांनी ‘इंडिया टूडे’साठी लिहिलेल्या एका लेखात या प्रश्नाचं उत्तर सापडतं. आसामी लोकं कुत्र्याचं मांस खातात, हा एक फार पूर्वीपासून निव्वळ गैरसमज असल्याचं छेत्री म्हणतात. ते म्हणाले, ईशान्येतील काही लोक कुत्र्याचे मांस खातात, परंतु आसाममध्ये किंवा ईशान्य प्रदेशात ही प्रथा नाही.
इंडिया टूडेशी बोलताना आसाममधील बऱ्याच प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी कडू यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्या राज्याला योग्य तो आदर दिला जावा अशी मागणी केली आहे. अभिनव प्रयास एनजीओच्या संस्थापक अध्यक्षा उर्मिमाला दास म्हणाल्या, बच्चू कडू यांनी जे सांगितलं ते निराधार आहे. त्यांनी आपली टिप्पणी मागे घ्यावी आणि आसामी समुदायाची माफी मागावी. आसाममधील लोक कुत्र्याचं मांस खात नाहीत आणि अशी विधानं केवळ असंवेदनशील नाहीत तर आसामी लोकांच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे चुकीचे चित्रण करणारे आहेत.