पेट्रोल-डिझेलच्या VAT कपातीमुळे सरकारला का भरलीये धडकी?
PM Modi Petrol-Diesel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, यामध्ये पीएम मोदींनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत देण्याचा सल्ला दिला होता. पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्क कमी केले होते आणि राज्यांना कर कमी करण्याचे आवाहन केले […]
ADVERTISEMENT

PM Modi Petrol-Diesel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, यामध्ये पीएम मोदींनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत देण्याचा सल्ला दिला होता. पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्क कमी केले होते आणि राज्यांना कर कमी करण्याचे आवाहन केले होते. पण काही राज्यांनी माझे ऐकले नाही. व्हॅट कमी करून नागरिकांना फायदा व्हावा, अशी माझी विनंती आहे. असे त्यांनी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड आणि तामिळनाडू यांची नावे घेतली होती. त्याचवेळी कर्नाटक आणि गुजरातसारख्या भाजपशासित राज्यांचे कौतुक करत त्यांनी व्हॅट कमी केला नसता तर हजारो कोटींचा महसूल मिळाला असता, असेही ते म्हणाले होते.
पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरुन राजकारण तापले
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर राजकारणही तीव्र झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी तर राज्य आणि केंद्राच्या करांची आकडेवारी देत मोदींच्या वक्तव्यावर टीका केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सर्वाधिक कर महाराष्ट्रातून येतो, तरीही केंद्राकडे 26 हजार कोटींचा जीएसटी येणे बाकी आहे. महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जात आहे.