मोठी बातमी : शरद पवारांच्या आमदाराचा सख्खा भाऊ भाजपमध्ये प्रवेश करणार
Sharad Pawar NCP MLA Sandeep Kshirsagar brother will join BJP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा सख्खा भाऊ भाजपात प्रवेश करणार, बीडमध्ये मोठ्या घडामोडी
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा सख्खा भाऊ भाजपात प्रवेश करणार,
बीडमध्ये मोठ्या घडामोडी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार
Sharad Pawar NCP MLA Sandeep Kshirsagar brother will join BJP, बीड : बीड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची बिगुल वाजले असून बीड नगर परिषदेमध्ये कायम क्षीरसागर यांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. मात्र आता या वेळेच्या निवडणुकीमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी निवडणूक पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडून आमदार संदीप क्षीरसागर यांनी वेगळी भूमिका घेतली होती. आता यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी आता भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर असा सामना रंगणार? हे पाहाणे सर्वांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. हेमंत क्षीरसागर यांना भाजपमधील पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. लवकरच पक्षप्रवेश होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत आमदार संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या लहान भावाने म्हणजेच हेमंत क्षीरसागर यांनी राजकीय प्रवासात खंबीर साथ दिली. मात्र आता हेच हेमंत क्षीरसागर सख्ख्या भावाचे थेट राजकीय प्रतिस्पर्धी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हेमंत क्षीरसागर हे संदीप क्षीरसागर यांच्यासमोर आव्हान उभं करतील, अशी राजकीय चर्चा बीडमध्ये रंगली आहे.










