छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे सूरज चव्हाण राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी, रुपाली ठोंबरे अन् मिटकरींनी मोठा धक्का
Ajit Pawar NCP spokesperson list : छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे सूरज चव्हाण राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी, रुपाली ठोंबरे अन् मिटकरांनी मोठा धक्का
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे सूरज चव्हाण राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी
रुपाली ठोंबरे अन् मिटकरांनी मोठा धक्का, पक्षाने प्रवक्तेपदावरुन हटवलं
Ajit Pawar NCP spokesperson list : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षाची भूमिका मांडण्यासाठी 17 जणांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना प्रवक्तेपदासाठी संधी देण्यात आली आहे. याबाबतचं पत्रक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढलं आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांना काही दिवसांपूर्वीच पक्षाने नोटीस बजावली होती. आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे. म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे 7 दिवसांच्या आत करावा अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी, अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. मात्र, आता त्यांची प्रवक्तेपदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवाय विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना देखील प्रवक्तेपदावरुन हटवण्यात आले आहे.
राष्ट्रवादीने खालील 17 जणांना प्रवक्तेपदासाठी संधी दिली आहे...
रुपाली चाकणकर










