धनंजय मुंडेना मोठा धक्का, परळीतील विश्वासू सहकाऱ्याला शरद पवारांनी गळाला लावलं, मुंबईत पार पडला पक्षप्रवेश
Dhananjay Munde : धनंजय मुंडेना मोठा धक्का, विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धनंजय मुंडेना मोठा धक्का, विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडली
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
रोहिदास हातागळे /बीड (दि.10) : परळी वैद्यनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख व त्यांच्या पत्नी संध्याताई दिपक देशमुख यांनी आज (दि.10 नोव्हेंबर) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. देशमुख दाम्पत्याच्या या प्रवेशामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात, विशेषतः परळीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
पक्षाच्या बड्या नेत्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशाच्या प्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आणि पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड हे उपस्थित होते. दिपक देशमुख व संध्या देशमुख यांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख आणि संध्याताई देशमुख यांच्या प्रवेशामुळे पक्षाला परळी वैद्यनाथ नगरपालिकेच्या आणि परिसराच्या राजकारणात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले, "दिपक देशमुख आणि संध्याताई देशमुख यांच्यासारख्या अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या नेत्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नक्कीच बळकटी मिळेल. आगामी काळात ते पक्ष वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील," असा विश्वास व्यक्त करतो.










