करमाळा हादरले! माझ्या बहिणीला भेटायला का आला? पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेहुण्याने केला खून

मुंबई तक

Solapur Crime : करमाळा हादरले! माझ्या बहिणीला भेटायला का आला? पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेहुण्याने केला खून

ADVERTISEMENT

Solapur Crime news
Solapur Crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"माझ्या बहिणीला भेटायला का आला?"

point

पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेहुण्याने केला खून

Solapur Crime , करमाळा (जि. सोलापूर) : पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेव्हण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना करमाळा तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मेव्हण्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

“तू माझ्या बहिणीला भेटायला का आला? मी तुला तिला भेटू देणार नाही”

अधिकची माहिती अशी की, विजय गाडे (वय 31, रा. केम) हा 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पत्नी रोहिणीला भेटण्यासाठी राहुल संजय धोत्रे यांच्या वीटभट्टीवर गेला होता. तिथे त्याची भेट मेव्हणा राहुल अशोक धवसे (मूळ रा. मस्तानशाहनगर, ता. हिंगोली, सध्या रा. केम) याच्याशी झाली. रोहिणीला भेटण्यासाठी आला आहे हे लक्षात येताच राहुलने विजयला रोखले आणि “तू माझ्या बहिणीला भेटायला का आला? मी तुला तिला भेटू देणार नाही,” असे म्हणत त्याच्याशी वाद घातला. याच वादातून संतापलेल्या राहुलने विजयला शिवीगाळ करून हाताने, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावर न थांबता त्याने जवळ पडलेल्या लोखंडी हत्याराने विजयच्या पोटावर वार केला. या हल्ल्यात विजय गंभीर जखमी झाला. स्थानिकांच्या मदतीने विजयला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. केम (ता. करमाळा) येथील भगवान श्यामराव गाडे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

गाडे यांच्या फिर्यादीनंतर करमाळा पोलिसांनी आरोपी राहुल अशोक धवसेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. शनिवारी दुपारी त्याला करमाळा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश श्रीमती कुलकर्णी यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून हत्येचे नेमके कारण व आरोपीने वापरलेल्या हत्याराचा तपास सुरू असून, घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हे वाचलं का?

    follow whatsapp