मुंबईतील संत्संगात नाचले अन् नंतर ह्रदयविकाराचा झटका, साताऱ्यातील पोलीस हवालदाराचा मृत्यू
Police constable dies due to heart attack : मुंबईतील संत्संगात नाचले अन् नंतर ह्रदयविकाराचा झटका, साताऱ्यातील पोलीस हवालदाराचा मृत्यू
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईतील संत्संगात नाचले अन् नंतर ह्रदयविकाराचा झटका
साताऱ्यातील पोलीस हवालदाराचा मृत्यू
Police constable dies due to heart attack ,Mumbai News : सातारा पोलिस दलातील हवालदार प्रवीण बाळकृष्ण काटवटे (वय 51, राहणार तांबवे, ता. कराड) यांचे रविवारी मुंबईतील भांडुप येथे आयोजित सत्संग कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रजा घेऊन ते कुटुंबासह या धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. त्यांच्या अचानक मृत्यूने संपूर्ण सातारा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
फिटनेस असूनही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
प्रवीण काटवटे यांनी 1997 साली सातारा जिल्हा पोलिसात भरती घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून ते कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. धार्मिक सत्संगासाठी ते काही दिवसांची रजा घेऊन मुंबईत गेले होते. कार्यक्रमात त्यांनी कुटुंबासह सहभाग घेतला आणि आनंदाने नृत्यही केले. मात्र, थोड्याच वेळात त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : गावातील तरुणाशी अनैतिक संबंध, संतापलेल्या पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, वर्ध्यातील घटना
मुंबईतील शासकीय रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा मृतदेह मूळगाव तांबवे येथे आणला जाणार आहे. सायंकाळी शासकीय इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या निधनाने पत्नी, मुले आणि भावंडे या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










