महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये का वाढतोय प्रादुर्भाव?
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून चांगलीच वाढते आहे. २१ ते ३१ मार्च या कालावधीत राज्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली. या सगळ्यामध्ये विशेष नोंद घेण्याची बाब ही की लहान मुलांमध्येही कोरोनाचं संक्रमण वाढू लागलं आहे. ११ ते २० या वयोगटात कोरोना होण्याचं प्रमाण राज्यात वाढतं आहे. याबद्दल तात्याराव लहाने यांनी उत्तर […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून चांगलीच वाढते आहे. २१ ते ३१ मार्च या कालावधीत राज्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली. या सगळ्यामध्ये विशेष नोंद घेण्याची बाब ही की लहान मुलांमध्येही कोरोनाचं संक्रमण वाढू लागलं आहे. ११ ते २० या वयोगटात कोरोना होण्याचं प्रमाण राज्यात वाढतं आहे. याबद्दल तात्याराव लहाने यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत
काय म्हणाले आहेत डॉ. तात्याराव लहाने?
महाराष्ट्रात जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा कोरोनाचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांना होत होता. आता दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग लहान मुलांमध्ये जास्त होतो आहे असं दिसून येतं आहे. साथरोग आजाराचे विषाणू हे त्यांचं स्वरूप बदलत असतात. पहिल्या लाटेत आलेला हा विषाणू हाच होता मात्र आता त्याचं स्वरूप बदललं आहे. पहिल्या लाटेत तीन-चार लोकांना संसर्ग होत होता. सध्याच्या घडीला या विषाणूचं बदललेलं स्वरूप हे एकापासून दहा जणांना संसर्ग करणारं ठरतं आहे. २० ते ४० या वयोगाटातील जो वर्ग आहे त्यांच्यामध्ये कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे.









