क्रांती रेडकरने का रद्द केली पत्रकार परिषद?, बहिणीच्या ड्रग्स केसबाबत नेमकं म्हणणं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी (8 नोव्हेंबर) सकाळीच एक खळबळजनक ट्विट शेअर करुन पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. समीर वानखेडे यांची मेहुणी ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला होता. दरम्यान, मलिकांनी हे ट्विट शेअर केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर ही पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता क्रांतीने पत्रकार परिषद रद्द केली आहे.

ADVERTISEMENT

एकीकडे मलिकांनी अत्यंत गंभीर सवाल उपस्थितीत केलेले असताना क्रांती रेडकर यांनी आयोजित पत्रकार परिषद का रद्द केली असा सवाल विचारला जात. दरम्यान, परिषद रद्द करताना क्रांती रेडकरच्या वतीने असं कळविण्यात आलं आहे की, संबंधित प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्याने तूर्तास याबाबत आपण काहीही बोलणार नाही.

पाहा पत्रकार परिषद रद्द करताना क्रांती रेडकर नेमकं काय म्हणाली

हे वाचलं का?

‘त्या’ ड्रग्स प्रकरणात माझी बहीण तर पीडित..

‘मला माहित आहे की श्री. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न आहेत. मी सांगू इच्छितो की, माझी बहीण या प्रकरणात पीडित होती आणि अद्यापही आहे. आमच्या कायदेशीर टीमच्या मते हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. माझी बहीण श्री. मलिक यांनी जे ट्विट केले आहे त्याला कायदेशीररित्या उत्तर देणार आहे. श्री. समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे.’ असं क्रांती रेडकरच्या वतीने पत्रकारांना कळविण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, आता क्रांती रेडकरची बहीण याप्रकरणी नवाब मलिकांविरोधात नेमका कोणता कायदेशीर मार्ग वापरणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण याआधी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी देखील नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे.

ADVERTISEMENT

‘समीर वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का?, उत्तर द्या’, मलिकांचा खळबळजनक आरोप

समीर वानखेडे म्हणतात.. माझा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही!

दुसरीकडे समीर वानखेडे यांनी या संपूर्ण प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिक यांच्या ट्विटनंतर पत्रकारांशी बोलताना वानखेडे म्हणाले की, ‘जेव्हा 2008 साली हे प्रकरण घडलं तेव्हा मी सेवेत देखील नव्हतो. मी 2017 साली क्रांती रेडकरशी लग्न केलं आहे. म्हणजेच ड्रग्ज प्रकरणातील केसनंतर तब्बल नऊ वर्षांनी. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. ही घटना जुनी आहे मग तरीही माझा या खटल्याशी संबंध कसा?’ असा प्रति सवाल वानखेडे यांनी नवाब मलिक यांना केला आहे.

नवाब मलिक यांचं नेमकं ट्विट काय?

‘समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तुम्ही याबाबत उत्तर दिलंच पाहिजे कारण तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. हा पुरावा आहे.’ असं ट्विट करत मलिक यांनी संबंधित केसबाबतचे काही कागदपत्र ट्विटरवर शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT